खासदार नंदकुमारसिंह चव्हान पंचत्वात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 09:43 PM2021-03-03T21:43:29+5:302021-03-03T21:44:00+5:30

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार नंदकुमारसिंह चौहान यांच्यावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

MP Nandkumar Singh Chavan merged into Panchatvat | खासदार नंदकुमारसिंह चव्हान पंचत्वात विलीन

खासदार नंदकुमारसिंह चव्हान पंचत्वात विलीन

Next
ठळक मुद्देमध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : मध्यप्रदेशातील निमाड प्रातांतील लोकनायक तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार नंदकुमारसिंह चौहान यांच्यावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांसह मध्यप्रदेशातील नेते मंडळींची उपस्थिती होती.

खासदार चव्हाण रहात असलेल्या जय निवास स्थानापासून दुपारी दीड वाजता निघालेली अंत्ययात्रा शाहपूर नगरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गस्थ होत त्यांच्या नवीन बसस्थानक रोडवरील स्वतः च्या शेतात पोहोचल्यानंतर शासकीय इतमामात मध्यप्रदेश पोलीसांनी बंदूकीच्या ३६ फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी विविध घोषणा देण्यात होत्या. अंत्यविधी सोहळ्यासाठी आलेेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शासकीय इतमामात पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर दिवंगत चौहान यांचे सुपूत्र हर्षवर्धनसिंह चौहान यांनी" हर हर महादेव "चा गजर करीत दुपारी ४: २० वाजेेच्या सुमारास साश्रुुनयनांनी भडाग्नी दिल्यााने निमाड की नैय्या असलेेले खासदार नंदकुमारसिंह चौहान पंचत्वात विलीन झाले.

प्रारंभी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री थावरसिंह गहलोत, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री फग्गनसिंह कुलथे, केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार राकेशसिंग शर्मा, मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम, मध्यप्रदेशचे मंत्री अरविंद भरोदिया, जलसंपदा मंत्री तुलसी शिलावट, मंत्री मोहन यादव, वनमंत्री विजय शाह, पर्यटन मंत्री उषा ठाकूर, ग्रामविकास मंत्री महेंद्रसिंह सिसोदीया, पशुसंवर्धन मंत्री प्रेमनारायण पटेल, यांनी नंदकुमारसिंह चौहान आदी उपस्थित होते.

Web Title: MP Nandkumar Singh Chavan merged into Panchatvat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.