खासदार संजय राऊत घेणार जिल्हा शिवसेनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:16+5:302021-06-09T04:21:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील शिवसेनेत संघटनात्मक बदल केल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील शिवसेनेत संघटनात्मक बदल केल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शनिवारी जिल्ह्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी दिली आहे. महापालिकेतील सत्तांतर, मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये शिवसेनेने फोडलेले भाजपचे नगरसेवक या घटनांनंतर संजय राऊत जिल्ह्यात पहिल्यांदाच आढावा घेणार आहेत.
११ रोजी संजय राऊत हे जिल्ह्यात दाखल होणार असून, शुक्रवारी सायंकाळी चोपडा येथे रावेर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता जळगाव येथे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. दोन्ही ठिकाणी विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच शहरात येणार आहेत. महापालिकेचादेखील ते आढावा घेणार आहेत. तसेच पुढील काही महिन्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकींबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत.