भुसावळातील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:22+5:302021-06-20T04:13:22+5:30
जळगाव : भुसावळ शहरातील कुख्यात गुन्हेगार शेख कलीम शेख सलीम (वय ३३) व तस्लीम ऊर्फ काल्या शेख सलीम (वय ...
जळगाव : भुसावळ शहरातील कुख्यात गुन्हेगार शेख कलीम शेख सलीम (वय ३३) व तस्लीम ऊर्फ काल्या शेख सलीम (वय २८, दोन्ही रा. दिनदयाल नगर) या दोघांवर शनिवारी एमपीडीएची कारवाई झाली. भुसावळ पोलिसांनी दोघांना स्थानबध्द करून त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कलीम याच्याविरुध्द ३८, तर काल्याविरुध्द २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. बाजार पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी दोघांचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यास अंतिम स्वरूप देऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पाठविला होता. राऊत यांनी शनिवारी त्याला मंजुरी देत स्थानबध्दतेचे आदेश पारित केले. त्यानुसार उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, सहायक फौजदार सुनील सोनवणे, हवालदार अनिल पाटील, सुभान तडवी, रमण सुरळकर, रवी बिऱ्हाडे, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, जीवन कापडे, परेश बिऱ्हाडे व प्रशांत परदेशी यांचे पथक नेमले. या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन नाशिक येथे रवाना केले.