विकास आराखड्यातील अडळ्यांबाबत खासदारांनी घेतली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:15+5:302021-02-24T04:18:15+5:30
या बैठकीला विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य करण पवार, नरेन जैन, जळगाव विमानतळाचे संचालक सुनिल मुगरीवार यांच्यासह विमानतळावरील विविध ...
या बैठकीला विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य करण पवार, नरेन जैन, जळगाव विमानतळाचे संचालक सुनिल मुगरीवार यांच्यासह विमानतळावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मीनल बिल्डिंग सह कार्गो टर्मिनल बिल्डिंग, विमानासांठी स्वतंत्र पार्किंग आदी आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी विविध अडथळे येत असून, यातील नशिराबाद ते कुसुंबा या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन विभागाकडे पाठपुरावा करुन १ कोटी ४ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे खासदारांनी या बैठकीत सांगितले. तसेच सध्या विमानतळा बाहेरील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, महामार्ग प्रशासनाकडून बाहेरील पार्किंगसह इतर सौदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे खासदारांनी या बैठकीत सांगितले.
इन्फो :
तर जळगाव-अजिंठा हेलीकॉप्टरची सेवा लवकरच
जळगाव विमानसेवा असल्यामुळे पर्यटकांना तात्काळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाता यावे, यासाठी जळगाव ते अजिंठा हेलीकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबत जळगाव विमानतळ प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी अजिंठा येथील हेलीपॅडची जागा ही राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे असून, ही जागा त्यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. त्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच होणार असून, ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जळगाव ते अजिंठा हेलीकॉप्टरची सेवाही लवकरच सुरू होणार खासदार उन्मेश पाटील यांनी `लोकमत`ला सांगितले.