खान्देशवासीयांची कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:22 PM2018-10-09T18:22:32+5:302018-10-09T18:24:46+5:30

अजिंठा, वेरूळ या लेण्याप्रमाणेच समकालीन अजिंठा पर्वतातच खान्देश व मराठवाड्याच्या हद्दीवरील घाटनांद्रा ता.सिल्लोड येथे भगवती जोगेश्वरी देवीची प्राचीन कोरीव लेणी आहे.

Mr. Jogeshwari Devi, Kulaswamyani of Khandesh residents, | खान्देशवासीयांची कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देवी

खान्देशवासीयांची कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देवी

googlenewsNext
ठळक मुद्देसाडे तीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू उपशक्तीपीठजळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीवर मंदिरनवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वरखेडी, ता.पाचोरा : अजिंठा, वेरूळ या लेण्याप्रमाणेच समकालीन अजिंठा पर्वतातच खान्देश व मराठवाड्याच्या हद्दीवरील घाटनांद्रा ता.सिल्लोड येथे भगवती जोगेश्वरी देवीची प्राचीन कोरीव लेणी आहे. जागृत साडे तीन शक्तिपीठांपैकी श्री जोगेश्वरी देवी हे आद्य स्वयंभू उपशक्तीपिठ आहे.
औरंगाबादच्या उत्तरेस ९० कि.मी. अंतरावर असलेल्या अजिंठा डोंगराच्या कुशीत आई जोगेश्वरी देवीचा निवास आहे. याठिकाणची हिरवीगार वनराई, पाण्याचे धबधबे, पक्षी, फुलपाखरे, फुले, प्राणी पर्यटकांना आकर्षित करतात. कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीच्या लेण्यांचे बांधकाम अतिशय प्राचीन आहे.
याठिकाणी अश्विन नवरात्रोत्सव, चैत्र नवरात्रोत्सव व कार्तिक नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. तसेच श्रीराम नवमी, हनुमान जयंती, गोकुळ अष्टमी, कोजागिरी, महाशिवरात्र, चतुर्दशी हे उत्सव साजरे केले जातात.
सन १९६७ ते १९९८ पर्यंत मंदिराची देखभाल तहसीलदार यांच्याकडून होत होती. मात्र सन १९९९ पासून नोंदणीकृत मंडळाकडुन मंदिराचा कारभार पहिला जातो.
नवरात्रोत्सवानिमित्त बुधवार १० पासून प्रारंभ होऊन बुधवार २४ पर्यंत सुरु राहणार आहे. या दरम्यान सकाळी ७ वाजता श्री भगवतीची प्रात: आरती पूजा, सकाळी ८ ते ९ पंचामृत अभिषेक पूजा, दुपारी १२ वाजता महानैवेद्य व आरती, सायंकाळी ७:३० वा. शांतीपाठ व आरती होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्तांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Mr. Jogeshwari Devi, Kulaswamyani of Khandesh residents,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.