श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्तेवर येणार टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:38 PM2019-05-09T12:38:43+5:302019-05-09T12:39:24+5:30

एकनाथराव खडसे

Mr. Mahavir Urban Co-Aap Cotton Society's directors will come to the property | श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्तेवर येणार टाच

श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्तेवर येणार टाच

Next

जळगाव : श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने १७ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून घेतलेले आठ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याने व सदर कर्जाची हमी घेतलेल्या संचालकांनी दिलेल्या धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी बँक संबंधित १० संचालकांच्या मालमत्तेवर बोझा लावणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या संचालकांमध्ये माजी आमदार मनीष जैन यांचाही समावेश आहे.
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येऊन या विषयी माहिती देण्यात आली. या वेळी एकनाथराव खडसे यांच्यासह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, चिमणराव पाटील, रवींद्र पाटील, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील, आमदार सुरेश भोळे, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
या वेळी माहिती देताना खडसे म्हणाले की, श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने २००२मध्ये जिल्हा बँकेकडून आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या वेळी क्रेडीट सोसायटीचे संचालक मनीष ईश्वरलाल जैन, सुरेंद्र नथमल लुंकड, सुभाष सागरमल साखला, महेंद्र दुर्लभ शाह, सुरेंद्र बन्सीलाल जैन, अजित बन्सीलाल कुचेरिया, तुळशीराम खंडू बारी, सपना अश्विन शाह, अपना अजय राका, सुरेशकुमार आनंदराजजी टाटिया या १० संचालकांनी कर्ज वसुलीबाबत हमीपत्र लिहून दिले होते. तरीदेखील हे कर्ज थकले आहे.
सहकार न्यायालयाने संचालकांवर ठेवली जबाबदारी
कर्ज थकल्याने जिल्हा बँकेने सदर संस्था व संचालक मंडळाविरुद्ध सहकार न्यायालयात १७ कोटी ५८ लाख ३ हजार ३८३ रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी लवाद दावा (क्र. २४९/२०१०) दाखल केला. त्याचा निकाल जिल्हा बँकेच्या बाजूने लागून संचालक मंडळावर कर्ज व त्यावरील व्याजाची वसुलीची जबाबदारी ठेवली, असल्याचे खडसे म्हणाले.
धनादेश अनादरप्रकरणी फौजदारी खटला
कर्ज फेडण्यासाठी श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्यावतीने जिल्हा बँकेला तीन कोटी व पाच कोटी रुपयांचे धनादेश देण्यात आले. त्यावर मनीष ईश्वरलाल जैन, सुरेंद्र नथमल लुंकड, सुभाष सागरमल साखला, विश्वनाथ रामसिंग पाटील यांच्या सह्या असून हे धनादेश वटले नाही. धनादेश अनादर प्रकरणी जिल्हा बँकेने फौजदारी खटला दाखल केला होता. त्याचाही निकाल बँकेकडून लागून ११ कोटी रुपये कॉम्पेशेशन व संंस्थेला २५ हजार रुपयांचा दंड व आरोपींना एक वर्ष साधी शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले असून त्यात ५० लाख रुपये कॉम्पेशेशन भरले आहेत.
आजपासून कार्यवाही करणार
श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या स्वमालकीच्या इमारतीचे अवास्तव मुल्यांकन देण्यासह बनावट कागदपत्रे सादर केल्यानेही जिल्हा बँकेने सदर संस्था व संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. कर्ज वसुलीसाठी बँक आता थेट संबंधित संचालकांविरुद्ध थेट कारवाई करणार असून ९ मे पासून संचालकांच्या मालमत्तेवर बोझा बसविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
माजी आमदार अडचणीत
श्री महावीर अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीच्या कर्ज प्रकरणात माजी आमदार मनीष जैन यांनीही हमीपत्र लिहून देण्यासह धनादेश दिले होते. मात्र कर्जफेड न होण्यासह धनादेशही न वटल्याने अमदार जैनदेखील जिल्हा बँकेच्या कारवाईमुळे अडचणीत आले आहेत.
या प्रकरणी न्यायालयाचा जो आदेश असेल तो मान्य राहणार आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या बाबत बोलणे योग्य नाही. राजकीय खेळीतून हेतूपुरस्सर ही कारवाई होत आहे.
- मनीष जैन, माजी आमदार तथा तत्कालीन संचालक.

Web Title: Mr. Mahavir Urban Co-Aap Cotton Society's directors will come to the property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव