मंगळवारपासून एम.एस्सी, एम.ए. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रथम फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 09:52 PM2020-12-21T21:52:11+5:302020-12-21T21:52:21+5:30
विद्यापीठ : प्रशाळेची यादी जाहीर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. (सर्व विषय) आणि एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली फेरी २२ व २३ डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या प्रवेश फेरीच्या यादीतील संबंधित विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालय/प्रशाळेत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सोमवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांची नावे व त्यांना देण्यात आलेले महाविद्यालये, प्रशाळेची यादी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे ही कळविण्यात आले आहे. या यादीप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, प्रशाळेत मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रती घेऊन स्वत: हजर राहणे आवश्यक असणार आहे. प्रवेश शुल्क ऑनलाइन स्वीकारले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी डेबिट कार्ड अथवा नेट बँकिगचा तपशील सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा.ए.बी. चौधरी यांनी सांगितले.