महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली प्रणिती शिंदे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:46+5:302021-05-16T04:15:46+5:30
विद्युत कर्मचारी संघटना : सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची मागणी जळगाव : अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती कल्याण मंडळाच्या तथा आमदार प्रणिती ...
विद्युत कर्मचारी संघटना : सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची मागणी
जळगाव : अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती कल्याण मंडळाच्या तथा आमदार प्रणिती शिंदे रविवारी जळगाव दौऱ्यावर आल्या असता, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली. यावेळी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा अन्यायकारक जीआर रद्द करून सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती देण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाचंगे, झोनल सचिव चेतनभाऊ तायडे, प्रमोद गजभिये, मनोज सोनवणे, श्याम तायडे आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना 'फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा द्यावा, मागासवर्गीय पदाधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक खोट्या बेमालूम तक्रारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, चेतन तायडे यांच्या अनुकंपा अंतर्गत पाठविलेल्या प्रस्तावास मंजुरी देणे, बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढणे यासह इतर मागण्यांचे निवदेन आमदार शिंदे यांना देण्यात आले.