महावितरणने केली झाडांची छाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:21+5:302021-04-28T04:17:21+5:30
जळगाव : येथील गणेश कॉलनी परिसरात महावितरण कंपनीने पावसाळ्याच्या आधी विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या आहेत. मात्र ...
जळगाव : येथील गणेश कॉलनी परिसरात महावितरण कंपनीने पावसाळ्याच्या आधी विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या आहेत. मात्र सकाळी छाटलेल्या फांद्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत उचल्या नव्हत्या.
महामार्गाच्या बाजूला लावलेली रोपे कोमेजली
जळगाव : महामार्ग चौपदरीकरणात अडथळा म्हणून असलेली अनेक डेरेदार झाडे कापण्यात आली. त्याऐवजी आता रस्त्याच्या बाजूला पुन्हा रोपे लावण्यात आली आहेत. मात्र या रोपांना पाणी घातले जात नसल्याने ही झाडे कोमेजली आहेत. सध्या उन्हाचा जोरदार तडाखा आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पाणी घालणे अपेक्षित असते. मात्र या झाडांना पाणीच घातले गेले नाही.
मनपा कर्मचारीच विनामास्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. शासनाने नागरिकांना घराबाहेर निघताना मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मनपाचे सफाई कर्मचारी हे आदेश मोडून फिरत असल्याचे दिसून येत आहे. दररोजची साफसफाई करताना हे कर्मचारी मास्क वापरत नसल्याचे दिसून येते.
अननस झाले स्वस्त
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून व्हिटामीन सीने युक्त असलेले अननस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. आधी त्याचे भाव चांगलेच वधारले होते. त्यावेळी अननस ७० रुपये किलोप्रमाणे विकले जात होते. मात्र आता वेळेची मर्यादा आणि विक्रीत घट झालेली असल्याने १०० रुपयात पाच नग या प्रमाणे अननसांची विक्री होत आहे.
खरबुजाचे भाव घसरले
जळगाव : ऐन उन्हाळ्यात गोड खरबूज खाण्याची मजा काही औरच असते. यंदा चांगल्या दर्जाचा माल जिल्ह्याच्या बाहेर विकला गेला आहे तर उरलेला माल अत्यंत कमी दरात विकला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ५० रुपयांत तीन नग या प्रमाणे खरबुजाची विक्री होत आहे. याआधी नेहमीच खरबूज हे किलोप्रमाणे विकले गेले आहे तर यंदा ते नगावर विकले जात आहे.