शिवाजीनगर उड्डाणपूल लगतचे महावितरणच काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:17+5:302021-05-29T04:14:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर पुलालगत असलेले विद्युत खांब हटवण्याचे काम अखेर महावितरण करूनच होणार असल्याचा निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर पुलालगत असलेले विद्युत खांब हटवण्याचे काम अखेर महावितरण करूनच होणार असल्याचा निर्णय शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या वर्षभरापासून हे काम मनपा की महावितरण अशा फेऱ्यात अडकले होते. अखेर हे काम आता महावितरण च्या माध्यमातून होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार सुरेश भोळे , जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील विकास कामांसाठी मंजूर २५ कोटी रुपयातील शिल्लक असलेल्या ४ कोटी १७ सतरा लाख रुपयांचा निधी खर्चात या समितीने मंजुरी दिली आहे. या निधी खर्चासाठी शासनाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती.या समितीत शहराच्या आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा देखील समावेश होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी ४ कोटी रुपयांचा निधी हा शिल्लक होता. दरम्यान शिवाजीनगर उड्डाणपुला लगतचा विद्युत काम स्थलांतर करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तसेच यासाठी निधी देखील उपलब्ध होत नसल्याने हे काम सातत्याने राखत होते. महापालिकेने २५ कोटी रुपयांमधून शिल्लक असलेल्या ४ कोटी रुपयांच्या निधीतून दीड कोटी रुपयांची तरतूद विद्युत खांब स्थलांतर करण्यासाठी केली होती. मात्र शासनाच्या त्रिसदस्यीय समितीने याबाबत निर्णय न घेतल्याने या निधीला मंजुरी मिळत नव्हती. अखेर शुक्रवारी पालकमंत्र्यांनी या निधीला मंजुरी देत, लवकरच निविदा प्रक्रिया राबवून हे काम मार्गी लावण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.
या कामांना मिळाली मंजुरी
१. सुप्रिम काॅलनीत व परिसरातील पाेलवर पथदिव्यांची व्यवस्था करणे.
२. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल लगतचे विद्युत खांब हटवण्यासाठी दीड कोटींची तरतूद.
३. कांचन नगर चाैघुले प्लाॅट परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५० लाख रूपये,
४. शहरातील स्त्री व पुरूषांकरीता स्वच्छतागृह,युरिनल्सची व्यवस्था करण्यासाठी ५० लाख रूपये,
५. डीमार्ट ते रामेश्वर काॅलनील आदित्य चाैक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ४८ लाख ४१ हजार रूपये,
६. पिंप्राळा स्मशानभूमी मध्ये दुरूस्ती, सुशाेभिकरण करून विकसीत करण्यासाठी ११ लाख रूपये असा ३ काेटी ३४ लाख रूपये खर्च हाेणार.