जीएमसीत म्यूकरची पहिली मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:10+5:302021-05-28T04:14:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्युकरमायकोसिसची लागण असलेल्या एका ४३ वर्षीय महिलेच्या वरच्या जबड्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

Mucker's first free successful surgery with GM | जीएमसीत म्यूकरची पहिली मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

जीएमसीत म्यूकरची पहिली मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : म्युकरमायकोसिसची लागण असलेल्या एका ४३ वर्षीय महिलेच्या वरच्या जबड्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील म्युकरमायकोसिस या आजाराची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. १८ जणांचे वैद्यकीय पथक आणि चार तास अशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून या महिलेला वाचविण्यात या पथकाला यश आले आहे.

पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावातील ही महिला रहिवासी असून, जीएमसीत २१ रोजी म्युकरच्या उपचारासाठी या महिलेला दाखल करण्यात आले होते. कोविडसोबतच म्युकरमायकसिसची लक्षणे जाणवल्यानंतर महिलेला कक्ष ७ मध्ये दाखल करण्यात आले. येथून वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले. आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा.डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. मात्र, बुरशीचा फैलाव अधिक होत असल्याने शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांच्या निरीक्षणात समोर आल्यानंतर यासाठी नियोजन सुरू करण्यात आले. गुरुवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी महिलेला शस्त्रक्रिया विभागात घेण्यात आले.

म्युकोरमायकोसिसच्या या पहिल्याच शस्त्रक्रियेत या ४३ वर्षीय महिलेचा वरचा जबड्याच्या भागावर शस्त्रक्रिया करून काळी बुरशी काढून टाकण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच ही शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. शास्त्रक्रियेनंतर तपासणीसाठी नमुने सूक्ष्मजीवशास्त्र व विकृतिशास्त्र विभागात पाठविण्यात आले आहे. महिलेला अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड यांनी भेट देऊन महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली.

१८ डॉक्टरांची टीम

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी ८ विभागातील प्रत्येकी दोन डॉक्टरांची मिळून शस्त्रक्रियेसाठी १८ जणांची टीम बनविली. यात शस्त्रक्रियेत कान, नाक, घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. प्रसन्ना पाटील, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, डॉ. विपीन खडसे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वाथी एम., डॉ. काजल साळुंखे, डॉ. स्वप्निल इंकणे, डॉ. अनिल पाटील, अधिपरिचारिका माधुरी महाजन, ज्योत्स्ना निंबाळकर, नजमा शेख यांचा समावेश होता.

दीड महिन्यापर्यंत नळीद्वारे अन्न

महिलेच्या वरच्या जबड्यावर ही शस्त्रक्रिया झाली असून, महिलेला द्रवपदार्थाद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पाडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली. सुमारे दीड ते दोन महिने महिलेला अशाच प्रकारे अन्न द्यावे लागणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

आज एक शस्त्रक्रिया

म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड व म्युकरची लागण असलेल्या सहा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका महिलेवर गुरुवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणखी एका महिलेवर शुक्रवारी किंवा शनिवारी जबड्याचीच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Mucker's first free successful surgery with GM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.