भडगाव येथील गिरणा नदीवरील मातीचा कच्चा बंधारा पाण्यात फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 07:48 PM2019-09-20T19:48:52+5:302019-09-20T19:49:10+5:30
गिरणा नदीवर बांधलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्याचा काही भाग गिरणा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे २० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे.
भडगाव, जि.जळगाव : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी येथील गिरणा नदीवर बांधलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्याचा काही भाग गिरणा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे २० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे. यामुळे पालिकेने कच्च्या बंधाºयावर केलेला खर्च वाया गेला आहे.
भडगाव शहरात पक्का बंधारा नाही. ग्रामपंचायतीच्या काळाप्रमाणेच पालिकेने निधी खर्चून येथील गिरणा नदीवर मातीचा कच्चा बंधारा बांधला होता. हा बंधारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मोलाचा ठरतो. मागील काळात गिरणा नदीच्या पुरात हा मातीचा कच्चा बंधारा वाहिल्याने नुकसान झाले होते. पालिकेने हा बंधारा दुरुस्त केल्याने बंधाºयात गिरणेच्या आवर्तनाच्या पाण्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागत होती. दुष्काळी काळातही हा बंधारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी फायद्याचा ठरला आहे. या महिन्यात परिसरात झालेल्या पावसाच्या पुराने हा बंधारा बराच जलाशयाने भरला होता. मात्र गिरणा धरणातून सोडलेल्या पाण्याने या मातीच्या बंधाºयाचा काही भाग वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. नदीवरील काही भाग दगडी, सिमेंटची भिंत असल्याने काही भाग सुरक्षित आहे. गिरणा धरणातून सध्या गिरणा नदीला ४००० क्युसेस पाणी सोडले आहे. अजून पाणी सुटल्यास किंवा याच पाण्याच्या प्रवाहात बंधाºयाचा उर्वरित मातीचा भाग वाहून जाण्याची भीती आहे. गिरणा नदीवर पालिकेने निधी खर्चून बांधलेला कच्चा बंधारा शहरासाठी फायद्याचा ठरत होता. मात्र हा बंधारा फुटत असून वाहत आहे. त्यामुळे भडगावला पक्का बंधारा होण्यापूर्वीच हा कच्चा बंधारा फुटल्याने, वाहिल्याने पालिकेने खर्च केलेला पैसा पाण्यात वाहून गेला आहे.
भडगावला पक्का बंधारा झाला असता तर आज ही वेळ आली नसती, अशी शहरातील नागरिकात चर्चा आहे. या बंधाºयावर मासे पकडण्यासाठी मासेमारी करण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. बंधाºयावर नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे.