मुहूर्त टळला.... स्वच्छ सर्वेक्षण समिती फिरकलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:16 PM2020-02-08T12:16:55+5:302020-02-08T12:17:34+5:30
३१ जानेवारीची मुदतही संपली
जळगाव : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ अंतर्र्गत जानेवारी महिन्यात तीन वेगवेगळ्या समित्यांकडून शहराची तपासणी केली जाणार होती. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत तपासणी करण्याची मुदत संपली असतानाही हगणदरी मुक्तीबाबतची तपासणी करणाऱ्या समितीला अद्यापही तपासणीचा मुहूुर्त सापडलेला नाही. तर इतर दोन समित्यांनी शहराची पाहणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत प्रशासन पूर्ण अनभिज्ञ आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण’ समितीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने चांगलाच गाजावाजा केला होता. शासनाकडून महिनाभरात तीन वेगवेगळ्या समित्यांकडून ही पाहणी करण्यात येणार होती. त्यात शहरातील कचºयाचे होणारे संकलन, कचºयाचे होणारे विलगीकरण व प्रक्रिया या दोन प्रक्रियांबाबतची पाहणी करण्यासाठी दोन समित्यांनी पाहणी केली. तिसरी समिती हगणदारी मुक्त शहराची पाहणी करण्यासाठी येणार होती. मात्र, ही समिती मुदत संपल्यानंतरही शहरात दाखल झालेली नाही.
दोन समित्यांकडून पाहणी आरोग्य विभागाला मात्र माहितीच नाही
जानेवारी महिन्याचा दुसºया आठवड्यात शहरात केंद्र शासनाच्या दोन समित्या दाखल झाल्या होत्या. तसेच समिती सदस्यांनी शहरातील विविध भागात जावून पाहणी देखील केली होती. याबाबत मात्र आरोग्य विभागाला अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी स्वच्छता समितीसमोर सफाईचे वाभाडे काढण्याचा इशारा दिल्यामुळे आरोग्य विभागाने ही माहिती लपविल्याचीही शक्यता पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
फिडबॅक अर्ज भरण्याचे काम सुरु
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मनपाने नेमलेल्या संस्थेकडून नागरिकांचे स्वच्छतेबाबतचे फिडबॅक अर्ज भरण्याचे काम सुरु असून, आतापर्यंत ७ हजार नागरिकांचे फिडबॅक अर्ज भरून घेण्यात आले आहेत. सहा महिन्यात एकूण ५० हजार नागरिकांचे फिडबॅक अर्ज घेतले जाणार असून, सर्व अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरातील स्वच्छतेची समस्या कायम असून,प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचविले जात असल्याचे समोर येत आहे.