मुक्ताई पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
By admin | Published: May 28, 2017 05:24 PM2017-05-28T17:24:12+5:302017-05-28T17:24:12+5:30
मुक्ताईनगर : उद्या प्रस्थान, सजावट पूर्ण
Next
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.28 - 308 वर्षाची अखंड परंपरा असलेली व 700 कि.मी. अंतराचा प्रवास असलेली श्री क्षेत्र कोथळी स्थित श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आली आह़े राज्यातील विविध भागातून पालखी सोहळ्यासाठी वारक:यांचे शहरात आगमन होण्यास सुरुवात झाली आह़े
गेल्या 308 वर्षापासून कोथळी, ता.मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताबाई समाधीस्थळ ते पंढरपूर अशी आषाढी वारीसाठीची परंपरा आहे. या वर्षी मंगळवारी म्हणजेच 30 तारखेला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी तसेच रथाची सजावट पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रात वैभवशाली परंपरा लाभलेल्या वारकरी पंथाचे आराध्य दैवत भगवान पांडूरंगाचे दर्शनाला पायी जाण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही टिकून आहे. राज्यातून वा परराज्यातून वारकरी संताचे दिंडी-पालखी सोहळे आषाढी-कार्तिकीस लाखो वारक:यांसह शेकडो दिंडय़ा पालख्या पंढरीत दाखल होतात. त्यात प्रमुख मानाच्या सात पालखी असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ,संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव या संतांच्या पालख्यांचा समावेश आहे. वाखरीतून पंढरीत प्रवेश ह्याच क्रमाने होतो़ त्यातीलच सर्वात लांब अंतराची आई मुक्ताईची पालखी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून 30 मे 2017 मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रस्थान करीत आहे. 308 वर्षाची अखंड परंपरा जोपासत 700 किमीचा 34 दिवसांचा प्रवास करीत मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, जालना , गेवराई, बीड, भूम, माढा, आष्टी मार्गाने 1 जुलै रोजी पंढरीत दाखल होईल.