आषाढी पर्वावर मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 05:12 PM2021-07-20T17:12:35+5:302021-07-20T17:13:46+5:30

आषाढी पर्वावर मुक्ताबाईने नगरपरिक्रमा केली}

Muktabai performed Nagarparikrama on Ashadi Parva | आषाढी पर्वावर मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा

आषाढी पर्वावर मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा

Next
ठळक मुद्देपंढरपूर मठात पालखीचा पाच दिवस मुक्कामपंढरपुरात मुक्ताबाई मठात पोहोचण्यास रात्रीचा वाजला होता एक

राजेंद्र भारंबे

पंढरपूर :
करिती क्षेत्र प्रदक्षिणा। त्याच्या पार नाही पुण्या ।।
मुक्ताईनगर येथून निघालेला मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा वाखरी येथील सकळ संतांचे भेटीनंतर २० तास प्रवास करीत रात्री १ वाजता मठात दाखल झाला. आषाढी एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करण्यात आली.
संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी - मुक्ताईनगर येथून निघालेली मुक्ताई पालखी वाखरी तळावर आपल्या भावंडांचे सकळ संतांचा भेट सोहळा झाला. वाखरीतून फक्त दोन भाविकांना पायी चालण्यास दिलेली परवानगी दहाही दिंडीचालकांना मान्य नव्हती. यावर प्रशासनाशी चर्चा करण्यात बराच वेळ गेला. अखेर ३० वारकरी ईसवाबीपासून पायी चालण्यास परवानगी मिळाली. पंढरपुरात मुक्ताबाई मठात पोहोचण्यास रात्रीचा एक वाजला होता. पाच दिवस मुक्काम मठातच राहील. येथेच दैनंदिन कीर्तन, प्रवचन, भजन आदी नित्योपचार पार पडत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करण्यात आली. सकाळी ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे व दुपारी ह.भ.प. संदीप महाराज खामणीकर यांचे कीर्तन पार पडले. एकादशीपासून पांडुरंगास नैवेद्यासाठी परवानगी असून फराळाचा पहिला नैवैद्य सम्राट पाटील व श्रध्दा पाटील यांनी दिला.
एकादशीस चंद्रभागा स्नानापासून भाविक वंचित
आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेच्या स्नानास अनन्यसाधारण महत्त्व वारकऱ्यांत आहे, परंतु प्रशासनाने ऐनवेळी चंद्रभागा स्नान नाकारल्याने नगरपरिक्रमेवरच समाधान मानावे लागले. बुधवारी पादुका स्नानास परवानगी मिळाली आहे.

Web Title: Muktabai performed Nagarparikrama on Ashadi Parva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.