मुक्ताईनगर येथे विद्यार्थिनीला डंपरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:40 PM2019-12-23T12:40:56+5:302019-12-23T12:42:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे एम. कॉम. या विभागात शिक्षण घेत असलेली नायगाव येथील ...

Muktai Nagar student injured at Muktabai College | मुक्ताईनगर येथे विद्यार्थिनीला डंपरची धडक

मुक्ताईनगर येथे विद्यार्थिनीला डंपरची धडक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे एम. कॉम. या विभागात शिक्षण घेत असलेली नायगाव येथील कु.स्वप्नाली प्रभाकर पाटील ही महाविद्यालयात  जात असताना रस्त्यावर पडलेल्या गिट्टीच्या गंजीतील दगडांत सदर विद्यार्थींनीचा पाय घसरला व त्यातच  रोडच्या कामावर असलेले सुसाट ढंपर आल्याने विद्यार्थीनीला  धडक बसली  व त्यात सदर  मुलीच्या पाय व डोक्यास जबर मार बसला.  त्याच वेळेस एस. एम. कॉलेज समोर असलेले  निलेश मेढे व सामाजिक कार्यकर्ता आसिफ शेख या दोघ तरुणांनी जखमी विद्यार्थीनीला तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावले व तिला शहरातील  पाटील हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर जगदीश पाटील यांच्याकडे उपचारार्थ तात्काळ घेऊन गेले.डॉ पाटील यांनी विद्यार्थींनीवर  प्रथम उपचार केला.मात्र गंभीर झालेली असल्याने तिला पुढील उपचारार्थ  जळगाव येथील खासगी रुग्णालयात  हलविण्यात आले आहे.
    शहरातून  इंदोर ते औरंगाबाद या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे . या कामावर ठेकेदाराद्वारा  ढंपर द्वारे कामाचे साहित्य वाहून आणले नेले जाते . त्यातच रस्त्याची पूर्ण एक साईड खोदकाम करून काँक्रीटीकरण सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने प्रचंड रहदारी ची समस्या निर्माण होत आहे .त्यातच या कामावरील ढंपर चालक सुसाट वाहन चालवितात व रोजच येथे किरकोळ अपघात होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी व ठेकेदारांची बेशिस्त वाहतूक यावर कोणत्याच अधिकाऱ्याचा वचक नाही .तसेच रहदारी सुरळीत करण्यासंदर्भात पोलीस प्रशासन देखील दिसून येत नाही .त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. आणि संबधितांना एखाद्या मृत्यू घंटेची प्रतीक्षा आहे का ? असा संतप्त सवाल देखील उपस्थित होत आहे .
    बोदवड ते  मुक्ताईनगर तसेच मुक्ताईनगर ते इच्छापुर (मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्याच्या कामांमुळे ठीकठिकाणी रस्ते खोदलेले असून या खड्ड्यामुळे आजपर्यंतदोन चाकी तीन चाकी तसेच चार चाकी वाहने अशी अनेक वाहनं घसरुन तसेच त्या खड्ड्यात पडून काही वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. कायमचे अपंगत्व आले आहे .
      खड्डे खोदलेले असताना त्याठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावलेले नसतात.  तसेच रस्त्यांवर गिट्टी पडलेली असते त्यावरून दुचाकी वाहने घसरतात. हीच गिट्टी डंपरच्या साह्याने वाहून  नेताना शहरातील मुख्य रस्त्यांवर गिट्टी व वाळू पडलेली असते . यामुळे यापूर्वीसुद्धा लोकांनी तसेच वाहनचालकांनी सरस्वती कंस्ट्रक्शन बाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. परंतु त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विभागांचे सपशेल दुर्लक्ष करीत आहे 
   
मुक्ताईनगर शहरात राहणारी की समस्या...
   गेल्या महिनाभरापासून मुक्ताईनगर शहरात मोठ्या प्रमाणात रहदारीची समस्या निर्माण झाली आहे बोदवड चौफुली ते स्मशानभूमी पर्यंत खामखेडा रस्ता पर्यंत खोदकाम एकाबाजूने झालेले असल्याने मोठ्या प्रमाणात आधारची समस्या निर्माण होत आहे संपूर्ण शहरातील वाहतूक ही एकेरी रस्त्याने होत असताना मुक्ताईनगर शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे यासंदर्भात अवजड वाहनांची वाहतूक ही वडगाव फाटा मार्गे वळवण्यात यावी अशी देखील प्रवासी मागणी करत आहेत.

सरस्वती कन्स्ट्रक्शन च्या ठेकेदार व मॅनेजर ला आ.चंद्रकांत पाटील यांनी दिल्या कानपिचक्या
       विद्यार्थीनीच्या अपघाताची माहिती कळताच आ.चंद्रकांत पाटील यांनी संबधीत ठेकेदार व मॅनेजरला भ्रमणध्वनीवरून याबद्दल जाब विचारला तसेच शहरातून रस्त्याचे पूर्वी बांधकाम  केलेल्या गटारी पेक्षा कमी उंचीवर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे .यामुळे शहरातील दुकानांवर आलेले ग्राहक हे गटार उंचीमुळे रस्त्यावरच वाहने उभी करतील व प्रचंड राहदारीची समस्या भविष्यात निर्माण होईल .तसेच रस्त्याच्या दुभाजकात शहराच्या सुंदरतेत भर निर्माण करतील अशी अशोक वृक्षांची व इतर आकर्षक झाडे लावावीत. कामातून उडणारी प्रचंड धूळ यावर उपाय म्हणून पाण्याची बारीक शी फवारणी होत असलेल्या कामावर व रहदारी सुरू असलेल्या रस्त्यावर ठेकेदाराने करावी याबद्दल संबधीतांना सूचना केल्या आहेत .तसेच तहसिलदार शाम वाडकर यांना देखील याबाबत कारवाई व्हावी अशी सूचना केली आहे

 

Web Title: Muktai Nagar student injured at Muktabai College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.