मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिर उघडले पहाटे पाच वाजता, मुक्ताईला नेसवली माऊलीची साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 09:26 AM2020-11-16T09:26:42+5:302020-11-16T09:27:46+5:30

मतीन शेख मुक्ताईनगर , जि.जळगाव : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री संत मुक्ताबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी ...

Muktai temple opens in Muktainagar at 5 am, Muktai wears Mauli sari | मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिर उघडले पहाटे पाच वाजता, मुक्ताईला नेसवली माऊलीची साडी

मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिर उघडले पहाटे पाच वाजता, मुक्ताईला नेसवली माऊलीची साडी

googlenewsNext


मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री संत मुक्ताबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता मुक्ताईला ज्ञानेश्वर माऊली (आळंदी) कडून आलेली साडी नेसवून आरती, पूजनाने मुक्ताई दर्शन भाविकांना खुले करण्यात आले आहे.

श्रीसंत मुक्ताबाई च्या श्री क्षेत्र कोथळी आणि मुक्ताईनगर येथील दोन्ही मंदिर भाविकांना दर्शनासाठी आजपासून खुले झाले आहे. वारकरी संप्रदायात आषाढि कार्तिकी एकादशी पाठोपाठ दर महिन्याच्या एकादशी वारीला अनन्य महत्व आहे दर वारीला भाविक मोठ्या संख्येन मुक्ताई दर्शनासाठी येथे येतात. कोरोना महामारीमुळे देवाचे दर्शन दुर्लभ झाले होते. आता पाडव्यापासून मंदिरे उघडी झाल्याने भाविक वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. संत दर्शनाची आतुर भेट आजपासून पूर्ण होणार आहे. सोमवारी पहाटे ५ वाजता मुक्ताई
ला अभिषेक करून आळंदी येथून संत ज्ञानेश्वरां कडून आलेली हिरवी साडी चोळी नेसवून आरती करण्यात आली हभप रवींद्र महाराज हरणे ज्ञानेश्वर हरणे यांनी पौरोहित्य केले. भाविकांची उपस्थिती होती.
जुने मुक्ताई मंदिर येथे हभप उद्धव महाराज जुणारे यांनी पौरोहित्य केले.



राज्यातील मंदिर, मशीद, चर्च, बुद्धविहार यासह सर्वच धार्मिक स्थळे उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दी अनुसरून ठिकठिकाणच्या मंदिरात मर्यादित जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. शासनाचे कोविडसंदर्भात नियम पाळूनच मंदिर आणि धार्मिक स्थळामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
- दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंग व हातपाय धुण्याची व्यवस्था.
- भाविकाला ताप असल्यास त्यास तातडीने संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था.
- रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधून किमान ५० जणांच्या तब्येतीविषयी फीडबॅक संस्थान आठवडाभराने घेणार.
- ६५ वर्षांपुढील भाविकांना दर्शनासाठी अनुमती नाही.
- समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. मात्र चावडी आणि मारुती मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल.
- सत्यनारायण, अभिषेक, पूजा, ध्यान मंदिर, पारायण कक्ष बंद राहील.

 

Web Title: Muktai temple opens in Muktainagar at 5 am, Muktai wears Mauli sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.