मुक्ताईनगर शहरात छत्रपती पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:00 PM2018-12-21T17:00:58+5:302018-12-21T17:02:41+5:30

मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी यांना देण्यात आले.

In Muktainagar city the work of Chhatrapati Purna statue can be done fast | मुक्ताईनगर शहरात छत्रपती पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे

मुक्ताईनगर शहरात छत्रपती पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे

googlenewsNext
ठळक मुद्देनगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावेग्रामीण मराठाची मागणीनगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी यांना देण्यात आले.
ग्रामीण मराठातर्फे विविध मागण्यांसाठी पदाधिकारी व समाजबांधवांच्या वतीने नगरपंचायतीते नगरअध्यक्ष नजमा तडवी मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ़ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने व लवकरात लवकर करण्यात यावे, मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, प्रवर्तन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात कायमस्रूपी सफाई कामगारची नेमणूक करणे व तीथे रंगरंगोटी करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच सदर कामे त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी यु. डी.पाटील, ईशवर रहाणे, अ‍ॅड.पवनराजे पाटील, नितीन पाटील, राहुल शेळके, भागवत दाभाडे, मोहन पाटील, दिनेश कदम, नरेंद्र पाटील, कल्पेश पाटील, राहुल चोपडे, प्रदीप पाटील, पिंटू चव्हाण, बालू पाटील, कैलास मोषे, मनोज पाटील, गोपाळ पाटील, हर्षल पाटील, विठ्ठल पाटील, पवन करहाड, गजानन निंबालकर, राजेंद्र कापसे, रवींद्र चौधरी, प्रवीण चौधरी, भोला पाटील, अरुण पाटील, संतोष पाटील, मुक्ताईनगर ग्रामीण मराठाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: In Muktainagar city the work of Chhatrapati Purna statue can be done fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.