मंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी मुक्ताईनगरच्या आमदारांनी उघडले मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:01 PM2020-10-01T23:01:10+5:302020-10-01T23:01:17+5:30

व्हिडीओ झाला व्हायरल : पूजा व आरतीही केली

Muktainagar MLAs open temple for minister's health | मंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी मुक्ताईनगरच्या आमदारांनी उघडले मंदिर

मंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी मुक्ताईनगरच्या आमदारांनी उघडले मंदिर

Next


बोदवड : कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद असताना बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा हनुमान मंदिर हे गुरुवारी उघडून तेथे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चक्क होम हवन व पुजा तसेच आरतीही केली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच चर्चा होत असून नियम केवळ सर्वसामान्याच का? आमदारांंनी नियमभंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे कोरोनामुक्त व्हावे यासाठी बोदवड तालुकायतील शिरसाळा मारोती मंदिरात मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, महेंद्र मोंढळे व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी या मंदिरात पूजा केली असा हा व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले आहेत.
नियम मोडला नाही - आमदार पाटील
याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, मंदिराच्या पटांगणात मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हनुमंताला साकडे घालत होम व आरती केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन केले आहे, तर काही करीकर्त्यांनी ते फोटो काढले असून जो व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहे तो जुना आहे. मात्र निव्वळ राजकारणासाठी सर्व काही सुरू असल्याचेही ते म्हणाले.
कार्यकर्ते म्हणतात मंदिरात फक्त आम्ही
याबाबत कार्यकत्यार्नी फक्त आम्ही मंदिरात पूजा केली परंतु आमदार साहेब होते असे म्हटले आहे. दरम्यान एकीक सर्वसामान्य जनतेला मंदिर दर्शन बंद असताना आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मंदिर उघडे केले जात असल्याने सोशीलमीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.

Web Title: Muktainagar MLAs open temple for minister's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.