मुक्ताईनगरच्या आमदारांनी शहरात भेदभाव करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:17 AM2021-05-26T04:17:58+5:302021-05-26T04:17:58+5:30

- उपनगराध्यक्षा मनीषा पाटील मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरात नव्याने जी कामे मंजूर झाली आहेत, ती कामे मुक्ताईनगर शहरातील ...

Muktainagar MLAs should not discriminate in the city | मुक्ताईनगरच्या आमदारांनी शहरात भेदभाव करू नये

मुक्ताईनगरच्या आमदारांनी शहरात भेदभाव करू नये

Next

- उपनगराध्यक्षा मनीषा पाटील

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरात नव्याने जी कामे मंजूर झाली आहेत, ती कामे मुक्ताईनगर शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे आमदार हे केवळ काही प्रभागाचेच नसून, संपूर्ण शहराचे आहेत, तर त्यांच्या नगरसेवकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी, अशी भावना मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. याप्रसंगी नगरसेविका साधना हरिश्चंद्र ससाणे, नगरसेवक मस्तान कुरेशी, नगरसेवक शकील, नगरसेवक नीलेश सिरसाठ, नगरसेवक बिल्किसबी आसिफ बागवान, नगरसेवक कुंदा अनिल पाटील, नगरसेवक शमिनबी अहमद खान उपस्थित होते.

याबाबत त्या पुढे म्हणाल्या की, मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले, तेव्हा आमचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी १५ ते २० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करीत असताना, शहरातील सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये समान न्याय या हक्काने विकास कामे करण्यात आलेली आहे. त्यात प्रभाग १२, १४, १७ या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्येही विकास कामाचा समावेश होता. मात्र, आता आपले आमदार यांनी नव्याने मंजूर करून जी कामे आणली आहेत, ती सेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मंजूर करण्यात आली आहेत. यात काही गौडबंगाल आहे का? त्यांच्या नगरसेवकांनी आधी जाहीर करावे, अशी मागणी करून आमदार हे शहरातील काही ठरावीक प्रभागांचेच नसून, त्यांनी संपूर्ण शहरातील विकास कामे करावीत, अशी मागणी करून सेनेच्या नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी मागणीही केली आहे. एवढेच नव्हे, तर नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक हजर नसतानाही त्यांच्या प्रभागातील कामे आपण मंजूर केल्याचा दावा भाजपच्या नगरसेवकांनी याप्रसंगी केला, तसेच नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आल्यानंतर, एकनाथ खडसे यांनी २० कोटी रुपयांची विकासकामे आणली होती, ती सर्वच प्रभागांसाठी होती. अशा ठरावीक प्रभागांना विरोध त्यामध्ये कधीही केला नाही, असेही नगरसेवकांनी या प्रसंगी मत व्यक्त केले.

भाजप उपगट नेत्याचा आरोप

पत्रकार परिषदेला हजर असलेले सर्वच नगरसेवक भाजपचेच आहेत का, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये यापैकी बहुतांशी नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती उपस्थिती देतात, असा आरोप भाजपचे उपगटनेते संतोष उर्फ बबलू कोळी यांनी केला आहे.

Web Title: Muktainagar MLAs should not discriminate in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.