मुक्ताईनगर येथील मुक्ताई साखर कारखान्याने दिला २० रुपये वाढीव भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:09 PM2018-12-07T19:09:32+5:302018-12-07T19:10:36+5:30
मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि., या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाचा ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि., या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाचा एफ.आर.पी.प्रमाणे प्रति मेट्रिक टन १७८० आणि २० रुपये वाढ असे एकूण १८०० रुपये प्रति मेट्रिक टन एक रकमी दर ऊसपुरवठादार शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे, तर कारखान्याने प्रतिदिन तीन हजार ३०० मेट्रिक टन असे उच्चांकी गाळप गाठले आहे.
२९ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामात आतापर्यंत ७७१३० मे.टन ऊस गाळप झाले आहे. ६१३०० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे व आज ९.४५ टक्के साखर उतारा मिळत असून, सरासरी साखर उतारा ८.३८ आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा १२ मेगाव्हॅट सहवीजनिर्मीती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून २५ लाख ३६ हजार ८०० युनिट वीज कंपनीला निर्यात करण्यात आलेली आहे.
गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी कारखाना व्यवस्थापनामार्फत चालू हंगामात देय असलेला उसाचा एफ.आर.पी. दर रुपये १७८० प्रति मे.टन आहे, त्यामध्ये प्रति मे. टन २० रुपये वाढ करुन १८०० रुपये प्रति मे.टन एक रकमी दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कारखान्याने १५ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या उसाचे १८०० रुपये प्रति मे.टनाप्रमाणे ऊस बील संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे व यापुढील ऊस बील एफ.आर.पी. धोरणानुसार वेळोवेळी कारखाना मुदतीत अदा करेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी दिली.
कारखान्यामध्ये आवश्यक ती मशिनरी दुरुस्ती व आधुनिकीकरण करून घेतले. यामुळे चालू हंगामात कारखाना ३२०० ते ३३०० मे.टन प्रति दिन गाळप करीत आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पसुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. याप्रमाणे गाळप होत राहिल्यास कारखाना ऊर्जितावस्थेत येऊन ऊस उत्पादकांना जास्तीत-जास्त ऊस दर देणे सोईचे होणार आहे. कारखान्याची अशीच वाटचाल सुरू राहण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी ऊस लागवड करून जवळील वाहतुकीचा ऊस उपलब्ध झाल्यास शेतकºयांना अधिक ऊस दराचा मोबदला देणे सोईचे होईल, असे कारखान्याच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी कळविले आहे.
२५०९ मेट्रिक टन क्षमतेच्या या करखान्यात अत्याधुनिकीकरण करून ५ रोजी कारखान्याने उच्चांकी ३३५० मे.टन ऊस गाळप केले असून, ३००० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. त्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाकडून अधिकारी व कर्मचाºयांचे अभिनंदन करण्यात आले, अशी माहिती जनरल मॅनेजर अमृत देवरे यांनी दिली.