मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी. ओ. पाटील यांची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:42 AM2020-06-17T10:42:21+5:302020-06-17T10:50:25+5:30

मुक्ताईनगर पंचायत समितीच्या माजी सभापतींची हत्या करण्यात आल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

Muktainagar Panchayat Samiti's Mahi Chairman D. O. Patil killed by slitting his throat | मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी. ओ. पाटील यांची गळा चिरून हत्या

मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी. ओ. पाटील यांची गळा चिरून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकुऱ्हा येथील घटनाघटनास्थळी जमला जमावपोलीस अधिकारी दाखलपरिसर केला सीलश्वानपथक दाखल


विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील कुर्‍हा येथील रहिवासी तसेच पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गळा चिरून तसेच मानेवर वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोलपंपाच्या परिसरामध्ये ही हत्या झाली. रात्री ही घटना किती वाजेची आहे यासंदर्भात कोणाला काहीही माहिती नाही. तसेच ते घरून रात्री बाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्यासोबत दोघे जण झोपलेले असल्याची चर्चादेखील ऐकायला मिळत आहे. सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव या परिसरात जमला.
घटनास्थळाला पोलिसांनी सील केले असून, आत कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
डी.ओ. पाटील हे अतिशय मनमिळावू राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होते.
ते मुक्ताईनगर पंचायत समितीला माजी सभापती म्हणून कार्यरत होते व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळावर पोलिसांचे हॅप्पी नामक श्वानपथक दाखल झाले.
शान पथकाने पेट्रोल पंपासमोर असलेल्या नाल्यापर्यंत माग दाखवला असून पथक थांबून गेले आहे.
डी .ओ. पाटील हे शेतीच्या कामानिमित्त ात्री-अपरात्री डिझेल भरण्यासाठी जात असत. बर्‍याचदा याचा पेट्रोल पंपावर ते रात्री झोपूनही जात असत. मारेकऱ्यांना याची माहिती असावी व त्यातूनच हा खून नियोजनबद्ध रित्या केला असावा, अशी माहिती मिळत आहे. मयत पाटील यांच्यासोबत ट्रॅक्टरचालक व एक व्यक्ती सोबत असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.
जळगाव येथून मोठ्या संख्येने पोलीस कुमकदेखील घटनास्थळी हजर झालेली आहे.
दरम्यान, सकाळी सहा वाजल्यापासून मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक कैलास भारसके तसेच पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे हे घटनास्थळावर हजर झाले. ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आतापर्यंतची परिस्थिती नियंत्रणात आहे. अद्यापपावेतो कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Muktainagar Panchayat Samiti's Mahi Chairman D. O. Patil killed by slitting his throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.