मुक्ताईनगर तालुका तीन दिवस ठेवणार पूर्णपणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:48 PM2020-04-27T21:48:04+5:302020-04-27T21:48:10+5:30

मुक्ताईनगर : तालुक्यातील मन्यारखेडा येथे कोरोना बाधित महिला येऊन गेल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रविवारी संपर्कात आलेल्या १४ जणांना ...

Muktainagar taluka to be kept completely closed for three days | मुक्ताईनगर तालुका तीन दिवस ठेवणार पूर्णपणे बंद

मुक्ताईनगर तालुका तीन दिवस ठेवणार पूर्णपणे बंद

googlenewsNext

मुक्ताईनगर : तालुक्यातील मन्यारखेडा येथे कोरोना बाधित महिला येऊन गेल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रविवारी संपर्कात आलेल्या १४ जणांना जळगाव येथे तपासणीसाठी पाठवले असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या सभागृहांमध्ये प्रशासनाची तातडीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तीन दिवस संपूर्ण तालुका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे ,तहसीलदार श्याम वाडकर, गट विकास अधिकारी सुभाष मावळे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी निलेश पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे, जि. प. चे माजी गटनेते विनोद तराळ, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड. मनोहर खैरनार, प्रवीण चौधरी हे उपस्थित होते.
या निर्णयानुसार दुचाकी वाहनांना देखील रस्त्यावर येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. दवाखाने आणि मेडिकल वगळता किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
क्वारंटाईन व्यक्ती
फिरताना आढळली
मुक्ताईनगर होमक्वारंटाईन केलेला व्यक्ती शहरातील प्रवर्तन चौकात सोमवारी आढळून आल्याने अचानक खळबळ उडाली. पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश जाधव,पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सदर व्यक्तीची चांगलीच कानउघाडणी केली आणि घराकडे रवाना केले.
कोविड कक्षाला आमदार पुरवणार भोजन
उपाययोजना म्हणून मुक्ताईनगर शहरातील आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाच्या इमारती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकी ४० असे ८० बेडचे कोविड कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तर तिसरा कक्ष निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी महाविद्यालयाच्या वास्तूचा देखील विचार प्रशासन करत असून तालुक्यात एकूण दीडशे बेड स्वतंत्ररित्या निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व बेडसाठी बेडशीट व उशा तसेच संध्याकाळचे जेवण हे आमदार चंद्रकांत पाटील हे स्वखचार्तून पुरवण्यात येणार आहे.

Web Title: Muktainagar taluka to be kept completely closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.