मुक्ताईनगर तालुक्यात कडबा कडाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:53 PM2019-04-09T17:53:02+5:302019-04-09T17:56:34+5:30
मुक्ताईनगर तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या कडबा पेंडीचा दर शेकडा तीन हजार ते तीन हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या कडबा पेंडीचा दर शेकडा तीन हजार ते तीन हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पैसे मोजूनही कडबा मिळत नाही, तर दुसरीकडे गहू, हरभरा कुटाराचे दरदेखील वधारले असून मध्य प्रदेशातील हरदा येथून कुटार आयात होत आहे.
पशुधनाला लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची निकड भागविण्यासाठी केळीचे पिलं पत्ती कंबळ, पिंपळ, सुबाभूळ, चाराही विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे तर दुभत्या जनावरांसाठी अंजनाचा पाला मिळेनासा झाला आहे.
गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यासोबतच चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात ज्वारीचा पेरा नगण्य होता. ज्वारीऐवजी अलीकडे सोयाबीन पिकाला शेतकºयांनी पसंती दिल्याने ज्वारीचे उत्पादन घटले. पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला आहे. परिणामी, कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, कडब्याच्या एका पेंडीचा दर २५ ते ३५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे तर या कडब्यापासून तयार होेणाºया कुट्टीचा दर सहा ते नऊ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे.
यावर्षी तुरीच्या कुटाराचे दर चार ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले असून सोयाबीनचे कुटाराचा दर तीन ते चार रुपये किलो झाला आहे. गहू व हरभºयाचे कुटार पाच ते सहा रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. सुबाभूळ, पिंंपळ, कडूनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने बाजारात विकला जात आहे.
चाºयाचे दर प्रचंड वाढल्याने शेतकºयांना पशुधन अडचणीचे वाटत असून, या भागात गव्हाचे कुटार वापरावर भर दिला जात आहे. मध्य प्रदेशातील हरदा परिसर गव्हाचे आगार असल्याने या ठिकाणावरून दररोज तालुक्यात गव्हाचे व हरभरा कुट्टी मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
चाºयाची तीव्र टंचाई ओळखून अनेक शेतकºयांनी शेतातील काही भागात पिकांऐवजी हिरवा चारा लागवड केला आहे. जेणे करून पशुधनासाठी चारा उपलब्ध करता येईल.