मुक्ताईनगर तालुक्यात वाघांचा प्राचीन काळापासून अधिवास, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:13 PM2018-04-01T12:13:50+5:302018-04-01T12:13:50+5:30

प्राचीन शाश्वत संचार मार्ग

In the Muktainagar taluka, tigers have been domiciled from ancient times, in the Bombay Gazetteer | मुक्ताईनगर तालुक्यात वाघांचा प्राचीन काळापासून अधिवास, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख

मुक्ताईनगर तालुक्यात वाघांचा प्राचीन काळापासून अधिवास, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख

Next
ठळक मुद्दे१८२२मध्ये खान्देशात सुमारे ५०० व्यक्तींचा आणि २०००० गुरांचे बळी वाघांनी घेतल्याची नोंद मे, जून, जुलै १८२२ मध्ये ६० वाघांना ठार करण्यात आले

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - खान्देशात विशेषत: मुक्ताईनगर तालुक्यात वाघ आणि इतर वन्यजीवांचा अधिवास अतिशय प्राचीन काळापासून असून या विषयीच्या सुस्पष्ट नोंदी बॉम्बे गॅझेटिअरमध्ये आढळून आल्या आहेत. इतकेच नव्हे १९७०च्या सुमारास एका शेतात वाघाची शिकार झाल्याच्या घटनेलाही स्थानिक लोक उजाळा देतात.
१८२२मध्ये खान्देशात सुमारे ५०० व्यक्तींचा आणि २०००० गुरांचे बळी वाघांनी घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे मे, जून, जुलै १८२२ मध्ये ६० वाघांना ठार करण्यात आले होते. तत्कालीन ब्रिटीश सरकारने वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मदतीला स्वतंत्र भिल सेना तयार केली होती. कारण खान्देशापासून संपूर्ण पश्चीम भारताचे क्षेत्र हे वाघ आणि इतर वन्यजीवांनी व्यापलेले होते. विशेषत: १८६२ नंतर उत्तरेला निमाड राज्यापासून (मध्यप्रदेश) पूर्व आणि दक्षिण पूर्वेला हत्ती हिल्स, दक्षिणेला सातमाळाची पर्वतराजी आणि पश्चिमेला डांग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाघांचा अधिवास होता असे, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये म्हटले आहे. उल्लेख असलेले संचारमार्गांचे क्षेत्र म्हणजेच बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख केलेला हाच भूभाग होय. निमाड मध्यप्रदेशमध्ये पश्चिमेला विंद्य आणि सातपुड्याचा मध्यभागी वसलेले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेकडील १२० कि.मी. क्षेत्र अजिंठा पर्वतराजिनी व्यापले आहे. महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणत: पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी दरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. पूर्णा नदीच्या खोड्यात पूर्वेकडे हत्ती हिल्स आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण पुर्वेकडे मुक्ताईनगर तालुक्यात ३२ किमी परिसर हत्ती हिल्सने व्यापला आहे. या वरून या क्षेत्रात वाघांचे अस्तित्व किती प्राचीन आहे, हे सिद्ध होते.
डोलारखेडा नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र स्वातंत्र्यत्तोतर कालखंडातही शिकारीसाठी प्रसिद्ध होते. येथे लांब लांबहून लोक शिकारीसाठी येत असत आणि ग्रामस्थाना बोलाविले जात असे. १९७०च्या सुमारास भागवत नागो इंगळे यांच्या शेतात वाघाची शिकार झाल्याची घटना आपल्याला आठविते, असे इंगळे आणि पंढरी पाटील यांनी सांगितले.

Web Title: In the Muktainagar taluka, tigers have been domiciled from ancient times, in the Bombay Gazetteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.