मुक्ताईनगरात महिला कर्मचारी भिडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 12:22 AM2017-02-11T00:22:34+5:302017-02-11T00:22:34+5:30
बसस्थानकातील प्रकार : भ्रमणध्वनी आपटला
मुक्ताईनगर : भिवंडी घटनेच्या निषेधार्त जिल्ह्यात एस.टी. आगार बंद आंदोलन होते, त्यामुळे मुक्ताईनगर आगारही बंद आहे का? अशी विचारणा करण्यासाठी एस. टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाºयास महिला कर्मचाºयाने फोन केला असता याचा राग येवून दुसºया महिला कर्मचाºयाने पहिलीचा भ्रमणध्वनी जमिनीवर आपटून फोडला व संघटनेच्या पदाधिकाºयास यापुढे फोन करायचा नाही असा दम भरला.
यामुळे दोघींमधील कडाक्याच्या भांडनाने बसस्थानक स्तब्ध झाले होते. भांडणा दरम्यान अत्यंत शिवराळ भाषेचा वापर दोघींनी केला़ याचवेळी बसस्थानक परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्रवास करणाºया महिला हा प्रकार पाहून संतप्त झाल्या होत्या़ तर या घटनेबद्दल शहरातही चर्चा सुरू झाली होती.
मोबाईल फोडून धमकी दिल्याची तक्रार आगार व्यवस्थापकाकडे करण्यासाठी महिला कर्मचारी गेली परंतु संघटनेच्या पदाधिकाºयांचा विषय असल्याने आगार व्यवस्थापकांनी तक्रारीला बगल देऊन पदाधिकाºयांशी संपर्क करुन विषय बंद करण्याची ताकीद दिली. याबद्दल काही कर्मचाºयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. विषयाची धग जळगावपर्यंत पोहोचल्याने विभागीय नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी मुक्ताईनगर आगाराला हजेरी लावली होती. त्यांना या घटनेबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा प्रकार माहीत नसून तक्रार आल्यास कारवाई करु असे सांगितले. मात्र एका कर्मचाºयाने सांगितले की त्या कर्मचारी महिलेवर संघटनेचा दबाव आल्याने ती तक्रार देण्यास कचरत आहे व पुढेही तिला कामकाज करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे संघटनांच्या माध्यमातून कर्मचाºयांना न्याय मिळाला पाहीजे परंतु अशा प्रकरणात पदाचा दुरूपयोग होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.