मुंबईची विमानसेवा १० जुलैपासून पुर्ववत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:11+5:302021-07-03T04:12:11+5:30
केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत जळगाव विमान तळावरून कोरोना काळातही जळगाव ते मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होती. शासनाने ७ ...
केंद्र शासनाच्या उड्डाण योजने अंतर्गंत जळगाव विमान तळावरून कोरोना काळातही जळगाव ते मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होती. शासनाने ७ जून पासून अनलॉक केल्यानंतर आणि त्यात विमानतळावरील `ॲटीजन चाचणी`ची अट रद्द केल्यामुळे प्रवाशांचा या सेवेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, विमान कंपनीतर्फे अचानक विमानाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आल्यामुळे, पंधरा दिवसांपासून जळगाव ते मुंबई सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच विमान कंपनीकडून दुसऱ्या विमानाच्या मार्फत पर्यायी व्यवस्थाही करण्यात न आल्यामुळे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. या बाबत `लोकमत` प्रतिनिधीने नैमिश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विमानाच्या तांत्रिक कारणामुळे मुंबईची विमानसेवा स्थगित आहे. मात्र, लवकरच पूर्ण होऊन, १० जुलै पासून ही सेवा नियमित केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे प्रवाशांच्या जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी सेवा देता येईल,याबाबत विविध निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच मुंबईची विमानसेवा दररोज सुरू राहण्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही जोशी यांनी सांगितले.