मनुष्य विकास मंत्रालयाच्या मानांकनात उमविची घसरण
By admin | Published: April 6, 2017 01:45 PM2017-04-06T13:45:44+5:302017-04-06T13:45:44+5:30
एनआयआरएफ अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या देशातील शंभर विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानांकनात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे.
Next
पिछेहाट : गेल्यावर्षी होता 59 वा क्रमांक
जळगाव,दि.6 - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिटय़ुशनल रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत सोमवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या देशातील शंभर विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानांकनात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. गेल्यावर्षी या मानांकनात 59 व्या क्रमांकावर असलेल्या उमविचा समावेश यंदा पहिल्या शंभर मध्ये नाही.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी ही यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिल्या 100 मध्ये समावेश नाही. या संदर्भात गेल्याच महिन्यात मनुष्यबळ विकास मंत्रायलयाकडून उमविच्या विविध योजना, अभ्यासक्रम, गुणवत्ता याबाबतची माहिती मागविण्यात आली होती. मात्र यंदा उमवि पहिल्या शंभरात स्थान मिळवू शकले नाही. राज्यातील पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ दहाव्या क्रमांकावर आहे. विद्यापीठाकडून एनआयआरएफ रॅकिंगचा विचार करता यंदा नवीन योजना, तसेच उपक्रम राबविण्याची तयारी सध्या केली असली तरी 2016-17 या वर्षाचा मानांकनात उमविची पिछेहाट झाली आहे.
गेल्या वर्षी अनेक मोठय़ा विद्यापीठांनी या प्रकिक्रयेत सहभाग घेतला नव्हता. पण यंदा सर्वच विद्यापीठांनी या रँकींगबाबत अर्ज केल्यामुळे इतर विद्यापीठे पुढे गेली आहेत.
प्रा.पी.पी.पाटील, कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.