मुंबई - नागपूर दुरंतो एक्स्प्रेस आजपासून पुन्हा धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:03+5:302021-06-16T04:24:03+5:30
दिव्यांग बांधवांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई जळगाव : दिव्यांग बांधवांच्या डब्यामधून प्रवास करणे बेकायदेशीर असतानादेखील अनेक प्रवासी दिव्यांग बांधवांच्या ...
दिव्यांग बांधवांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
जळगाव : दिव्यांग बांधवांच्या डब्यामधून प्रवास करणे बेकायदेशीर असतानादेखील अनेक प्रवासी दिव्यांग बांधवांच्या डब्यातून प्रवास करताना आढळून येत आहेत. यामुळे दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलातर्फे दिव्यांग बांधवांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
राजधानी एक्स्प्रेसला जनरल डबा जोडण्याची मागणी
जळगाव : मुंबई ते दिल्लीदरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला सर्व डबे वातानुकूलित आहेत. तसेच वातानुकूलित डब्यांचा तिकीट दरही सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेसला जनरल डबा जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
जळगाव : रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे, वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत होती. अखेर मनपा प्रशासनातर्फे दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.