मुंबईच्या NCB पथकांची मोठी कारवाई, 1500 किलो गांजा पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 11:31 AM2021-11-15T11:31:41+5:302021-11-15T11:32:35+5:30

एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे.

Mumbai NCB squads seize 1500 kg of cannabis in jalgaon | मुंबईच्या NCB पथकांची मोठी कारवाई, 1500 किलो गांजा पकडला

मुंबईच्या NCB पथकांची मोठी कारवाई, 1500 किलो गांजा पकडला

Next
ठळक मुद्देआंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.  

जळगाव - राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जप्रकरण चांगलेच चर्चेत आणि वादात आहे. त्यात, एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे ईडीनंतर आता एनसीबी ही तपास यंत्रणाही चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनगरहून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर, आता मुंबई एनसीबी पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही कारवाई करण्यात आली.   

एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 1500 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून २४ किलो चरस आणून मुंबईला पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी २४ किलो चरस जप्त केला. ज्याची किंमत सुमारे १४ कोटी ४० हजार आहे. विशेष बाब म्हणजे ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत.

Web Title: Mumbai NCB squads seize 1500 kg of cannabis in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.