मुंबईतील प्राध्यापिकेचे दोन लाखांचे दागिने लंपास
By admin | Published: May 20, 2017 11:35 AM2017-05-20T11:35:18+5:302017-05-20T11:35:18+5:30
प्राध्यापिका उज्ज्वला किशोर पाटील (मधुकुंज विहार, खारघर, मूळ रा. भुसावळ) या विवाहितेचे दोन लाख रुपये किंमतीचे
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 20 - बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत मुंबई येथील प्राध्यापिका उज्ज्वला किशोर पाटील (मधुकुंज विहार, खारघर, मूळ रा. भुसावळ) या विवाहितेचे दोन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र व इतर दागिने चोरटय़ाने लांबवल़े बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरटय़ांचा शोध घेतला जात आह़े
मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या उज्ज्वला किशोर पाटील (मधुकुंज विहार, खारघर) या कामानिमित्त भुसावळात आल्या होत्या़ त्या जळगावला जाण्यासाठी रावेर-औरंगाबादमध्ये चढत असतानाच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरटय़ाने पर्समधील मंगळसूत्र, नेकलेस, सात हजारांचा मोबाईल असा दोन लाख 11 हजारांचा ऐवज लंपास केला़ बसमध्ये बसल्यानंतर ही बाब लक्षात येताच त्यांनी पतीसह बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली़ सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक आशीष शेळके यांनी बसस्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरटय़ाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ अज्ञात चोरटय़ाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े