काळ्या हळदीच्या बहाण्याने मुंबईच्या युवकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:09+5:302021-05-28T04:14:09+5:30
सूत्रांनुसार, सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ मे रोजी सचिन अंजुर पवार याने त्याच्या मोबाइलच्या ...
सूत्रांनुसार, सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ मे रोजी सचिन अंजुर पवार याने त्याच्या मोबाइलच्या व्हाॅट्सॲपवर यू ट्युबवरील काळ्या हळदीचा व्हिडीओ पाठविला. ही काळी हळद गळ्यात लावल्यास तुमचे नुकसान होणार नाही. आर्थिक भरभराट होईल, असे खोटेनाटे सांगून त्यास एक पाव हळदीसाठी ५० हजार रुपये घेऊन मुक्ताईनगरच्या बोदवड चौफुलीवरील पुलाखाली बोलावले. या वेळेस सचिन अंजुर पवार व सागर अंबादास गंगातीरे या दोघांनी सुनील गायकवाड याला ५० हजार रुपये दे, आमचा माणूस हळद घेऊन येत आहे, असे सांगितले. मात्र या गोष्टीचा सुगावा पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकत दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुक्ताईनगर न्यायालयात दोघांची जामिनावर सुटका झाली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करत आहेत.