मनपा दवाखान्यांची आयुक्तांनी केली पाहणी
By admin | Published: June 16, 2015 02:49 PM2015-06-16T14:49:03+5:302015-06-16T14:52:26+5:30
शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरादेवी मंदिर परिसर, तसेच विटाभट्टी येथील मनपा दवाखान्याची मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पाहणी केली
धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या एकवीरादेवी मंदिर परिसर, तसेच विटाभट्टी येथील मनपा दवाखान्याची मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी पाहणी केली. यावेळी कर्मचार्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने नियमित येणार्या रुग्णांचे 'अँनालिसिस' करण्याची सूचना देण्यात आली.
महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधसाठा उपलब्ध नसल्याने मोठय़ा प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे चौथ्यांदा काढण्यात आलेल्या निविदेला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे औषधसाठा लवकरच उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यात काही रुग्ण नियमित येतात. आजारी नसतानाही ते काही औषधे फुकटात नेत असल्याने रुग्णांना औषधे शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा रुग्णांचे अँनालिसिस करावे. त्यांना समुपदेशन करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील देवपूर परिसरात एकवीरादेवी मंदिराजवळ असलेल्या मनपा दवाखान्याची जागा जवळपास ६ हजार चौरस फूट आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे स्थलांतर करून सदर जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा मार्केट उभारण्याबाबत विचार भविष्यात होऊ शकतो.