वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर अडचणी आल्यास मनपा जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:39 PM2020-07-30T12:39:49+5:302020-07-30T12:40:17+5:30

सत्ताधारी नगरसेवकाचा मनपाला इशारा : वॉटरग्रेस सत्ताधाऱ्यांमध्ये खदखद

Municipal Corporation is responsible in case of any problem after giving power to Watergrass | वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर अडचणी आल्यास मनपा जबाबदार

वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर अडचणी आल्यास मनपा जबाबदार

Next

जळगाव : शहरातील दैनंदिन सफाईचे काम पुन्हा वॉटरग्रेस कंपनीला देण्यात येणार असल्याचा मुद्यावरून सत्ताधारी भाजपातील नगरसेवकांमध्ये खदखद वाढत जात आहे. पक्षश्रेष्ठींनी एकीकडे वॉटरग्रेसला संधी देण्याचा निर्णय घेतला असताना, काही नगरसेवकांचा मात्र, वॉटरग्रेसला संधी दिली जावू नये अशी भूमिका घेतली आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून वॉटरग्रेसबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वॉटरग्रेसला पुन्हा संधी देवून अडचणी निर्माण झाल्यास त्यास मनपा प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा दिला आहे.


शहराच्या सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यावरून सुरुवातीपासून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफुस सुुरु आहे. वॉटरग्रेसला मक्ता दिल्यापासून शहरातील सफाईच्या प्रश्नापेक्षा सत्ताधाºयांमधील विरोध अन् पाठींब्यावरूनच जास्त गाजत आहे.
नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाने फेब्रुवारी २०२० पासून वॉटरग्रेसचे काम थांबविले होते. मात्र, वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा संधी दिली नाही तर कायदेशिर अडचणी निर्माण होतील त्यामुळे मनपाने पुन्हा वॉटरग्रेसला संधी देण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, महापौर भारती सोनवणे व नगसेवक कैलास सोनवणे यांनी वॉटरग्रेसला संधी देण्यात येवू नये अशी भूमिका घेतली होती.
मात्र, पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतला तर पक्षाच्या निर्णयाला पाठींबा राहिल असेही सोनवणेंनी सांगितले होते.
मात्र, आता नवनाथ दारकुंडे यांनीही मनपा आयुक्तांना निवेदन देत वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा संधी देताना विचार करावा, नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी कायम ठेवून नियमानुसार अधिकारी वर्गाने नियम पहून वॉटरग्रेसला मक्ता द्यावा असेही या निवेदनात म्हटले आहे. तसेच त्यांच्या निवेदनाबाबत खुलासा करण्याचीही मागणी दारकुंडे यांनी केली आहे.

३ आॅगस्टपासून वॉटरग्रेसकडून कामाला सुरुवात ?
सर्वपक्षीय नगरसेवकांनी वॉटरग्रेसला संधी देण्याबाबतच सर्व अधिकार आयुक्तांना दिल्यानंतर, आता ३ आॅगस्टपासून शहराच्या सफाईचे काम वॉटरग्रेस कंपनीकडून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मनपाने वॉटरग्रेस कंपनीला पत्र देखील दिले आहे. महापालिकेच्या सर्व घंटागाड्या पुन्हा वॉटरग्रेस कंपनीला देण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

वॉटरग्रेसला विरोध, पक्षाच्या भूमिकेला मात्र पाठींबा
सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांचा वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा संधी देण्याबाबत विरोध असला तरी पक्षाने वॉटरग्रेसला पुन्हा संधी देण्याबाबतची भूमिका घेतल्याने नगरसेवकांनी आपला विरोध म्यान करत, पक्षाच्या भूमिकेला पाठींबा दिल्याचे चित्र मनपातील सत्ताधाºयांमध्ये दिसून येत आहे.
 

Web Title: Municipal Corporation is responsible in case of any problem after giving power to Watergrass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.