गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सहा पथके राहणार तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:52+5:302021-03-13T04:27:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू ...

Municipal Corporation will have six teams deployed to control the crowd | गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सहा पथके राहणार तैनात

गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सहा पथके राहणार तैनात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. यादरम्यान शहरात कोणत्याही भागात गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनावर ही जबाबदारी सोपवली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने देखील जनता कर्फ्यू दरम्यान शहरात गर्दी होणार नाही. यासाठी महापालिका प्रशासनाकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग समिती अधिकाऱ्यांसह उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यावर देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील अत्यावश्यक सुविधे व्यतिरिक्त इतर व्यवसायिक दुकाने व इतर अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तरीही जनता कर्फ्यू दरम्यान इतर आस्थापने व दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. महापालिकेचा सहा पथकामध्ये एकूण १५० जणांचा समावेश आहे. प्रत्येक पथकात २५ कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. तसेच कोणत्याही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा शहरातील रस्त्यांवर देखील गर्दी झाल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

मुख्य भागासह उपनगरांमध्ये ही राहणार लक्ष

महापालिका प्रशासनाच्या पथकाकडून शहरातील मुख्य भागासह उपनगरांमधील भागात देखील गर्दी होणार नाही किंवा इतर दुकाने सुरू राहणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणार आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी शहरातील विविध भागात फिरणार असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करणार आहेत. यासह जिल्हा पोलिस प्रशासनाचे कर्मचारी देखील या कामी नियुक्त करण्यात आले आहेत.

Web Title: Municipal Corporation will have six teams deployed to control the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.