वरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:01 PM2017-11-28T13:01:52+5:302017-11-28T13:08:39+5:30
गिरीश महाजन गटाचे सुनील काळे यांची बाजी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28 - वरणगाव (ता. भुसावळ) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या आणि भाजप विरुद्ध भाजप अशा लढतीत गिरीश महाजन गटाचे सुनील रमेश काळे हे 18 पैकी 11 मते मिळवून विजयी झाले. मदत करणा:या चारपैकी एका अपक्षाला उपनगराध्यक्षपपद देण्यात आले. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये उभी फूट पडली आहे.
हात वर करुन मतदान घेण्यात आले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी निवड झाली.
पालिकेत 18 पैकी भाजप-8, राष्ट्रवादी काँग्रेस 5, अपक्ष -4 आणि शिवसेनेचा एक असे पक्षीय बलाबल आहे.
भाजपच्या रोहिणी जावळे व सुनील काळे या दोघांनी नगराध्यक्षपदासाठीअर्ज दाखल केले होते. यामुळे भाजपातच उभी फूट पडली होती.
आज झालेल्या निवडणुकीत काळे यांना 11 मते पडली. अपक्षांपैकी शेख अखलाक शेख यूसूफ यांनाही 11 मते मिळाली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या दुस-या उमेदवार रोहिणी जावळे यांना सात मते मिळाली.
या निवडीच्या पाश्र्वभूमीवर पालिका इमारतीबाहेर प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता.