पालिका कर्मचा:यांचे आंदोलन अखेर मागे
By admin | Published: April 25, 2017 12:30 AM2017-04-25T00:30:27+5:302017-04-25T00:30:27+5:30
आठव्या दिवशी : ‘काम बंद’ चा फियास्को, चर्चेतून घडून आली तडजोड
चाळीसगाव : सेवानिवृत्त पालिका कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात तडजोड होऊन 24 रोजी दुपारी अडीच वाजता आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते राजेंद्र चौधरी, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांचे हस्ते उपोषणाची सांगता झाली.
17 तारखेपासून पलिकेचे निवृत्त कर्मचारी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. 88 लाख 36 हजार 518 रु.इतकी रक्कम कर्मचा:यांना विविध देणीतून द्यावीत ही त्यांची प्रमुख मागणी होती. ती मागणी मान्य करत त्यापोटी 59 लाख 45 हजार 645 रु. आजच अदा केले जातील व उर्वरित रक्कम 28 लाख 90 हजार 873 रु. येत्या काही दिवसात दिले जातील तसेच शासनाकडून येणारे गौण खनिज, मुद्रांक शुल्क व करमणुक कराचे येणारे अनुदानही सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचा:यांना रािहलेल्या थकीत रकमेपोटी अदा करण्यात येईल असे लेखीपत्र मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी.एस.मराठे यांना दिले. त्याचे वाचन झाले व त्यावर चर्चा होऊन अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय झाला.
मनोगतात राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की कर्मचा:यांची मागणी रास्त आहे. विरोधक असतानाही या कर्मचा:यांच्या पाठीमागे होतो. आणि आताही आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीमागे आहोत. कामगार युनियनचे सरचिटणीस देविदास बोंदार्डे यांनी सांगितले की, उशीरा का होईना पदाधिका:यांनी कर्मचा:यांची मागणी मान्य करीत सोडवली आहे. यावेळी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, सुशील वानखेडे, शेख चिरागउद्दीन, भास्कर पुंडलिक पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आंदोलनकत्र्याना साथ म्हणून सोमवारी कार्यरत कर्मचा:यांनी कामबंद आंदोलनाचा इशार दिला होता. मात्र नगरपालिका कर्मचा:यांमध्ये फूट पडल्याने 24 रोजी काम बंद आंदोलनाचा फियास्को झाला. सोमवारी नगरपालिकेत कायम, हंगामी, रोजंदारी कामगारांनी 100 टक्के हजेरी लावून कामकाज केले. दुसरीकडे मात्र सेवानिवृत्त कर्मचा:यांचे आठव्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर दुपार्पयत आमरण उपोषण सुरू होते. चर्चेनंतर ते मागे घेण्यात आले.
सोमवारी पहाटे सफाई कामगारांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला होता परंतु ही बाब कळताच पालिका पदाधिका:यांनी या सफाई कामगारांची भेट घेतली आणि काही वेळेनंतर कामगारांनी पूर्ववत कामकाजात सहभाग नोंदवला. सकाळी 10 वाजता नगरपालिका कार्यालयात सर्वच अधिकारी व कर्मचा:यांनी हजेरी लावून कामात सहभाग घेतला.
कर्मचा:याला आली चक्कर
24 रोजी सकाळी उपोषणस्थळी अशोक किसन गोसावी या कर्मचा:याला चक्क़र आल्याने तो खाली पडला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी त्याची तपासणी केली. (वार्ताहर)