मनपा स्थायीची ९ रोजी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:26+5:302021-07-07T04:21:26+5:30

जळगाव - महापालिकेच्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेचे आयोजन शुक्रवारी दुपारी ४ वाजता सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले ...

Municipal standing meeting on 9th | मनपा स्थायीची ९ रोजी सभा

मनपा स्थायीची ९ रोजी सभा

Next

जळगाव - महापालिकेच्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेचे आयोजन शुक्रवारी दुपारी ४ वाजता सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सभेत एकूण दोन विषय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणासाठी नंदुरबार येथील संस्थेने दाखल केलेल्या निविदेला मंजुरीचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आला आहे. या सभेत आयत्यावेळच्या विषयावर वाद होण्याची शक्यता आहे.

कालंका माता चौकात सर्कल उभारा

जळगाव - शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत दुभाजकांचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गालगत असलेल्या कॉलन्यांमध्ये जाण्यास मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी दुभाजकांव्यतिरिक्त कालंका माता चौकात सर्कल उभारण्यात यावे, अशी मागणी या भागातील नगरसेवक डॉ. विरण खडके यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेविका रंजना वानखेडे, चंद्रशेखर अत्तरदे, हेमंत नेमाडे आदी उपस्थित होते.

पाईपलाईन फुटली

जळगाव - शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात मंगळवारी दुपारी ४ वाजता उपजलवाहिनीची पाईपलाईन फुटली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून रस्त्यावर आले होते, तर रस्त्यालगत देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याठिकाणच्या दुकानदारांना पाण्यातून जाताना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, मनपा पाणीपुरवठा विभागाने सायंकाळनंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

बाजार समिती परिसरात विक्रेत्यांनी मांडले ठाण

जळगाव - शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मुख्य रस्त्यालगत अनेक विक्रेत्यांनी सकाळपासूनच दुकाने थाटली असल्याने याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच दुपारी ४ वाजेनंतरदेखील याठिकाणी अनेक विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात. मात्र, मनपाकडून याठिकाणी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

Web Title: Municipal standing meeting on 9th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.