मनपा प्रभाग समिती सभापती निवड बिनविरोधच्या मार्गावर
By admin | Published: March 30, 2017 11:08 AM2017-03-30T11:08:26+5:302017-03-30T11:08:26+5:30
जळगाव मनपाच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी भाजपाने एकही अर्ज न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.
Next
भाजपाकडून एकही अर्ज नाही : खाविआ, राष्ट्रवादी व मनसेने घेतले अजर्
जळगाव: मनपाच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतींची 1 वर्षाची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 31 रोजी जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी उमेदवारी अजर्च नेलेले नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्ज नेण्याची मुदत संपली
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेण्याची मुदत 27 मार्च पासून 29 मार्च रोजी दुपारी 1 वाजेर्पयत होती. या कालावधीत खाविआतर्फे जितेंद्र मुंदडा यांनी 4 अजर्, राष्ट्रवादीतर्फे गायत्री शिंदे यांनी 2 तर रवींद्र मोरे यांनी 2 अर्ज नेले. मनसेतर्फे संतोष पाटील यांनी 2 तर पार्वताबाई भिल यांनी 2 अर्ज नेले आहेत. भाजपातर्फे मात्र एकही अर्ज नेण्यात आलेला नाही.
निवड होणार बिनविरोध
भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी उमेदवारी अजर्च नेलेले नाहीत. उर्वरित खाविआ, राष्ट्रवादी व मनसेतर्फे अर्ज नेलेले असले तरीही मनसेचे विजय कोल्हे यांना कृउबावर संचालक म्हणून संधी मिळाली असल्याने प्रभाग समिती सभापतीपद खाविआ 3 व राष्ट्रवादी 1 असे वाटून घेतले जाणार असल्याचे समजते.
वर्षभरात एकही सभा नाही
प्रभाग समिती कार्यालयामार्फत त्या अंतर्गत असलेल्या प्रभागांच्या किरकोळ समस्या, कामे मार्गी लावले जाणे अपेक्षित आहे. मात्र चारही प्रभाग समिती सभापतींनी वर्षभराच्या कालावधित एकही सभा घेतलेली नाही.