भुसावळ नगरपालिकेत समिती सभापती निवड निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:51 PM2018-01-05T16:51:55+5:302018-01-05T16:55:28+5:30
भुसावळात उपनगराध्यक्षांकडे नियोजन, शिक्षण अॅड.चौधरी, बांधकाम इंगळे, पाणी पुरवठा नाटकर
आॅनलाईन लोकमत
भुसावळ , दि.५ : नगरपालिका सभागृहात शुक्रवारी ५ रोजी विषय समिती सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार विशाल नाईकवडे होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी. टी.बाविस्कर, गटनेते मुन्ना तेली होते.
तहसीलदार नाईकवडे यांनी समिती सदस्यांच्या नावांची घोषणा केली. त्याला सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांनी मान्यता दिली. या यादीवरून बांधकाम समिती सभापतीपदी अमोल इंगळे, शिक्षण समिती सभापतीपदी अॅड.बोधराज चौधरी, आरोग्य समिती सभापतीपदी मेघा देवेंद्र वाणी, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी राजेंद्र नाटकर तर उपनगराध्यक्ष लोणारी यांची नियोजन समितीच्या सभापतीपदी वर्णी लावण्यात आली.
महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी अनिता सोनवणे, स्थायी समिती सभापतीपदी मुकेश गुंजाळ यांना संधी देण्यात आली. सभापती पदांची नावे निश्चित झाली आहेत.आता केवळ घोषणेची औपचारीकता आहे. शुक्रवारची सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
जनाधार पार्टीचे नगरसेवक सपकाळे सत्ताधारी गटात
३ जानेवारी रोजी शहरात एका गटाने अचानक दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. तीन प्रवाशी जखमी झाले. दुकानावर दगडफेक झाली होती. यामुळे पोलीस ठाण्यात जनाधार विकास पार्टीचे नगरसेवक रवींद्र सपकाळे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यावेळी उपनगराध्यक्ष लोणारी त्यांच्या मदतीला धावून आले होते. त्यामुळे सपकाळे शुक्रवारच्या पालिका बैठकीस उपस्थित राहिले. मात्र ते सत्ताधारी भाजपाच्या दालनात बसलले दिसले. ते स्व:पक्षीय गटावर रुसलेले दिसले.