बनावट कार्ड प्रकरणातील संशयित मुन्नी तथाकथित समाजसेवक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:12+5:302021-09-25T04:17:12+5:30

जामनेर : दिव्यांगांना प्रवास सवलतीचे बनावट कार्ड बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना लाभार्थी पुरविण्याचे काम करीत असल्याचे पोलिसांनी ताब्यात ...

Munni so-called social worker suspected in fake card case! | बनावट कार्ड प्रकरणातील संशयित मुन्नी तथाकथित समाजसेवक !

बनावट कार्ड प्रकरणातील संशयित मुन्नी तथाकथित समाजसेवक !

Next

जामनेर : दिव्यांगांना प्रवास सवलतीचे बनावट कार्ड बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना लाभार्थी पुरविण्याचे काम करीत असल्याचे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुमताजबी ऊर्फ मुन्नी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून रेशन कार्ड संबंधित कागदपत्रे, तलाठी कार्यालयाशी संबंधित दाखले आदी आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मुन्नी हिला शुक्रवारी पोलिसांनी नायालयात हजार केले.

दिव्यांगांना एसटी प्रवासात ७५ टक्के सवलतीसाठी लागणारे बनावट कार्ड बनवून दिले जातात व त्या कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचली होती. स्थानिक पातळीवर शहानिशा केल्यानंतर यातील संशयित शेख अब्दुल्ला शेख अमीन व मंगेश सोनार यांना उपनिरीक्षक किशोर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून काही कार्ड जप्त करण्यात आले. कार्डवर जामनेर आगारप्रमुख व जि.प. समाजकल्याण अधिकारी यांचे शिक्के असल्याने शिक्के मिळविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

दोघा संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गोरखधंद्यात सहभागी असलेली तिसरी संशयित मुमताजबी हिला गुरुवारी अटक करण्यात आली. गोरगरीब गरजूना रेशन कार्ड बनवून देणे, त्यांना संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित लाभ मिळवू देण्यासाठी सहकार्य करणे आदी समाजसेवेची कामे ती करीत असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत तिच्या घरातून रेशन कार्ड संबंधित कागदपत्रे, तलाठी कार्यालयाशी संबंधित दाखले मिळून आल्याचे समजले.

Web Title: Munni so-called social worker suspected in fake card case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.