मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:35 PM2019-08-14T12:35:06+5:302019-08-14T12:35:56+5:30

उंची वाढीचा मुहूर्त कधी?: ..तर जास्त पाणीसाठा झाला असता, दिरंगाईबाबत नाराजी

Murdapur dam starts flowing ... | मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

मुर्दापूर धरण ओसंडून वाहू लागले...

Next

नशिराबाद : येथून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या मुदार्पूर धरण उंची वाढीचे पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडलेले आहे. सातत्याने सूचना देऊन तसेच पाठपुरावा करूनही तापी महामंडळातर्फे उंचीवाढीच्या कामात दिरंगाई होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
यंदाही मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे. लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र धरणाची उंची वाढ झाली असती तर आज पाणी साठवण मोठ्या प्रमाणावर झाले असती मात्र प्रशासनाचा दिरंगाई व हलगर्जीपणाच उंची वाढीस कारणीभूत ठरत असल्याची ओरड होत आहे.
मुर्दापूर लघुपाटबंधारे तलाव सन १९९७ मध्ये बांधण्यात आला. मुर्दापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे.
त्यामुळे गेल्यावर्षी कमी पाऊस होवूनही धरण सध्याचा साठवण क्षमतेतच शंभर टक्के भरले. मात्र उंची वाढण्याचे काम ९५ टक्के झाले आहे पण केवळ पाच टक्के काम नऊ वर्षापासून रखडल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्यास अडचणी येतात. पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणावर नशिराबादची पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शेतीसाठीही याचा चांगला लाभ होणार आहे.
अतिरिक्त भूसंपादन अद्याप झालेले नाही, अशी सबब सांगण्यात येते. भूसंपादनासाठी सुमारे २४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास सन २०१५मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मग काम रखडले कसे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत दखल घ्यावी व धरणाच्या उंची वाढीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे २५ टक्के काम बाकी आहे. कारण उंची वाढीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे समजते. सन २०१०मध्ये वेग वर्धित सिंचन योजनेत या कामाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरुवात झाली. त्यामुळे या धरणाची सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर अवघे पाच टक्के काम रखडले आहे. हे पूर्ण झाले तर पाणीसाठ्यात वाढ होणार असून त्यामुळे तेथील गावकऱ्यांना लाभ होणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील व सहकारी शेतकरी हे वारंवार उंची वाढीसंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अनेकदा तक्रार करूनही अद्याप पाच टक्के उंचीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

खोदकामामुळे जलसाठ्यात वाढ
महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी याच धरणातून खोदण्याचे काम करण्यात आले त्यामुळे सुमारे एक ते दोन लाख घनमीटर धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे मात्र यंदा संततधार पाऊस व धानवड पिंपळे इथून झालेल्या धरणातील विसगार्मुळे मुर्दापूर धरण शंभर टक्के भरले असून ओसंडून वाहत आहे.

Web Title: Murdapur dam starts flowing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.