मोठ्या भावाकडून वडिलांसह भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 08:44 PM2020-07-12T20:44:43+5:302020-07-12T20:45:18+5:30

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथील घटना: लहान भावाच्या पत्नी ची तक्रार, आरोपीला अटक

Murder of brother along with father by elder brother | मोठ्या भावाकडून वडिलांसह भावाची हत्या

मोठ्या भावाकडून वडिलांसह भावाची हत्या

Next


पहूर ता जामनेर: जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे मोठा भाऊ निलेश याला वडील व लहान भावाने तु नेहमी भांडण करत असतो, असे म्हणून किरकोळ चापटा मारल्याच्या रागातून मोठ्या भावाने वडील आनंदा कडूबा पाटील यांना चाकूने वार करून ठार केले. नंतर लहान भाऊ महेंद्रवर वार करून त्यालाही संपविल्याची निर्दयी घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली असून परीसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश पाटील याला अटक केली आहे. तसेच चाकूही जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र आनंदा पाटील (२८) व त्याची पत्नी अश्विनी (२०)हे जळगावहून शनिवारी सकाळी आई वडील यांना भेटण्यासाठी आले. रात्री त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पांडुरंग हिरामण सोनवणे यांच्याशी मोठा भाऊ निलेश आनंदा पाटील(३५) याचे भांडण सुरू होते. यादरम्यान वडील आनंदा पाटील (५५) व लहान भाऊ महेंद्र पाटील यांनी निलेशला समजावून घरी आणले व तु नेहमी गावात भांडणे करीत असतो असे म्हणून तिन चार चापटा वडीलांसह महेंद्रने मारल्या. नंतर निलेश त्याच्या खोलीत झोपला. त्यांनतर सर्वजण झोपायला गेले. रात्री अकरा ते साडे अकरा वाजता निलेशने धारदार चाकूने ओट्यावर झोपलेल्या स्वत:च्या वडीलांचे तोंड दाबून सपासप वार केले. यात वडील जागीच ठार झाले. तर हे दृश्य आईने पाहिल्यावर आरडाओरड केली व लहान मुलगा भैय्या (महेंद्र) पळ असा आवाज दिला. या आवाजाने महेंद्र घटनास्थळा कडे येत असताना निलशने त्याच्यावर त्याच चाकूने वार केले व त्यालाही संपविल्याची घटना घडली, असे महेंद्रची पत्नी अश्विनी पाटील हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार भादवी ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा पहाटे चार वाजता दाखल करून निलेश पाटील याला अटक केली आहे.

मजुरी करणारे कुटुंब
जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. हे दोन हजार लोकसंख्येच गाव आहे. याठिकाणी आनंदा कडूबा पाटील यांना निलेश व महेंद्र ही दोन मुल व एक मुलगी तिचा विवाह झालेला आहे. पत्नी सह ते गावात राहतात. भूमीहीन असल्याने मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होते. निलेश पुण्याहून कोरोणा संक्रमणामुळे घरी आला तर महेंद्र जळगाव येथे चट ई कारखान्यात कामाला असून कुसुंबा ता. जळगाव येथे भाड्याच्या घरात राहतो. निलेश व महेंद्र या दोन्ही भावात सौख्य नव्हते. आमचे कधीच जमले नाही, असे निलेशने पोलीसांना सांगितले आहे.
निलेश पुण्याहून कोरोना मुळे आला घरी
निलेशचे लग्न झाले पण पत्नी त्याला सोडून गेली असून त्याचा स्वभाव भांडखोर असल्याचीे माहिती समोर आली. लहान भाऊ महेंद्रचे सासरे लोहारा येथे कृषी दुकानावर कामाला आहे.निलेशने त्यांच्याकडे मावसभावासाठी खत लागत असल्याची मागणी केली. निलेशचा स्वभाव विचित्र असल्याने महेंद्रच्या सासऱ्यांनी मुलगी अश्विनीला याची माहिती दिली. यावरून अश्विनीने महेंद्र ला सांगितले. तसेच अश्विनीने निलेशला तु वडिलांना फोन का लावला असे विचारल्याने दोघांमध्ये शनिवारी सकाळी शाब्दिक वाद झाल्याचेही सांगितले आहे.

स्वत: च्या चाकूने स्वत: चा घात
महेंद्र याचा प्रेमविवाह लोहारा येथील अश्विनीशी दोन अडीच वर्षांपूर्वी झाला आहे. त्यामुळे स्वरक्षणासाठी महेंद्र स्वत: जवळ चाकू बाळगायचा. जळगाव हून घरी आल्यावर त्याने चाकू एकाठिकाणी ठेवलेला होता. शनिवारी रात्री वाद झाल्याने निलेशने महेंद्रचाच चाकू घेऊन महेंद्र ला संपविल्याची दुर्दैैवी घटना घडलीे असे पोलिसांनी सांगितले आहे. निलेश ला पोलिसांनी ताब्यात घेऊन घटनेची विचार पूस केली. त्याच्या चेहºयावर घटनेच्या बाबतीत कोणताही पश्चाताप नव्हता तर तीन जण सुटले आहे. त्यांना मी नंतर पाहील असे तो म्हणाला असून एक एकच चाकूचा वार केला किंवा दोनही केले तरीही फाशीची शिक्षा आहे. असेही निलेश म्हणाल्याचे पोलिसांनी सांगितले.

भावजयी वाचली
निलेश ने क्रुरतेचा कळस गाठत वडिलांना संपविल्यानंतर भावाला संपविले. त्यानंतर त्याने भावजयी अश्विनी वर लक्ष केंद्रित करून चाकू घेऊन तिच्या वर धावला. मात्र अश्विनी तेथून पळाली व घरात जावून घराचा दरवाजा लावून घेतला.ही समय सुचकता अश्विनी ने केली नसती तर अश्विनी चाही घात झाला असता. घटनास्थळी पोलीस पाटील दिनेश कुहार्डे, अरूण शिंदे , प्रकाश पाटील, समाधान पाटील दाखल झाले आणि त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वडील व भाऊ यांना पाहीले. स्वत: निलेशने रुग्णवाहिका बोलावली व पोलीस पाटलांना घटनेची माहिती दिली. रात्री दोन वाजता जखमी अवस्थेत वडील व लहान भावाला ग्रामस्थांनी पहूर रुग्णालयात दाखल केले. तपासणी करून वैद्यकीय अधिकाºयांंनी त्या दोघांना मृत घोषित केले.

अधिकाºयांची घटना स्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोउनि अमोल देवडे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे , शशिकांत पाटील , जितेंद्र परदेशी ,ईश्वर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. निलेश पाटील याला ताब्यात घेतले. रविवारी पहाटे निलेश विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दोन्ही चे शवविच्छेदन डॉ. संदीप कुमावत, डॉ. सचिन वाघ व डॉ पुष्कराज नारखेडे यांनी केले. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याघटनेने गावात परीसरात हळहळ व्यक्त केली जाते.तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी करीत आहेत.

 

Web Title: Murder of brother along with father by elder brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.