‘पाऊले चालती पंढरीची वाट’ स्पर्धेत मस्कावदचे मंडळ द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 02:25 PM2021-07-25T14:25:20+5:302021-07-25T14:25:34+5:30
मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला.
मोठे वाघोदे, ता. रावेर : लेवा सम्राज्ञी फाऊंडेशन व सकल लेवा समाज मंडळ जळगाव यांच्यातर्फे आषाढी एकादशीनिमित्त पाऊले चालती पंढरीची वाट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेते ठरले.
समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून समाज एक आदर्श तसेच वारकरी सांप्रदायिक समाज म्हणून समाजाला ओळखला निर्माण व्हावी या हेतूने झालेल्या हा कार्यक्रम म्हणजे आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा आध्यात्मिक इव्हेंट आहे. ज्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपली भक्ती सारखेपणाने सादर केली. अशा या भक्तीमय कार्यक्रमात मस्कावदसीम गावातील आदर्श भजनी मंडळाने सहभाग नोंदविला होता. त्यात त्यांनी आपल्या भक्तीमय वातावरणात पांडुरंगाची भजने व सजीव देखाव्याच्या स्वरूपात सादर केले. या वेळेस आदर्श महिला मंडळामधील महिला सदस्या मंगला फेगडे, रंजना फेगडे, अलका फेगडे, सुलोचना फेगडे, ललिता फेगडे, वैशाली फेगडे, भारती फेगडे, स्वाती होले यांनी आपल्या सुरेख आवाजात भजने गायली व आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले.
पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होत उत्कृष्ठ भजने आणि अभंग सादर केले म्हणून आदर्श महिला भजनी मंडळ हे त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या या कलागुणांमुळे उपविजेत्या ठरल्या. त्यांना हर्षा सरोदे, भाग्येश आदींचे सहकार्य लाभले.