पारोळ््यात साकारले जातेय म्युझियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:44 AM2019-09-27T00:44:20+5:302019-09-27T00:44:24+5:30

ब्रह्मोत्सव : बालाजी मंदिर संस्थानची पत्रकार परिषद

The museum is being decorated | पारोळ््यात साकारले जातेय म्युझियम

पारोळ््यात साकारले जातेय म्युझियम

Next


पारोळा : पारोळा येथील आराध्य दैवत श्री बालाजी महाराज संस्थानकडून पर्यटनाच्या पाच कोटींच्या विकास निधीच्या माध्यमातून भव्य असे म्युझियम, प्रसादालय, अभिषेक कक्ष अशी तीन मजली वास्तू उभारण्यात येत असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य विश्वस्त तथा अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील बालाजी संस्थानमध्ये ब्रह्मोत्सवानिमित्त पत्रकार परिषद गुरुवारी झाली. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त केशव क्षत्रिय, नवनीत गुजराती, संजय कासार, अरुण नारायण वाणी, चंद्रकांत शिंपी आदी विश्वस्त उपस्थित होते.
संस्थानाचे पारंपारिक १६५ बाहुले हे म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असून ते भाविकांना वर्षभर पाहता येतील, ब्रह्मोत्सवात दररोज निघणारे वाहन त्या वाहनांच्या क्रमांनुसार म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी प्रसादालयाचेही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे. संस्थेचे विश्वस्त माजी खासदार ए.टी.पाटील यांनी पर्यटन विकासाच्या माध्यमातून पाच कोटीचा निधी मंजूर केला होता. पन्नास लाख रुपये निधीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन वास्तूचे काम प्रगतिपथावर आहे. बालाजी पार्क येथे नगराध्यक्ष करण पवार यांनी संस्थानाला दिलेल्या या जागेवर कल्याण कट्टा, भक्तनिवास, देवी पद्मावतीे मंदिर उभारण्याचा मानस संस्थानाचा आहे, अशी माहिती विश्वस्तांनी दिली. तसेच २९ सप्टेंबरपासून शहरात ब्रह्मोत्सवाला सुरुवात होत आहे. ९ आॅक्टोबर रोजी रथोत्सव होईल.

 

 

Web Title: The museum is being decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.