देशभर मुशायरा गाजवतोयं नगरदेवळ्याचा शायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:20 PM2019-02-16T22:20:25+5:302019-02-16T22:21:17+5:30

दिल्लीत आमंत्रण

Musharra is everywhere in the city | देशभर मुशायरा गाजवतोयं नगरदेवळ्याचा शायर

देशभर मुशायरा गाजवतोयं नगरदेवळ्याचा शायर

Next
ठळक मुद्देखान्देशात मिळाला पहिलाच मान


 
चुडामण बोरसे ।
जळगाव : घरची स्थिती अतिशय जेमतेम. पण लहानपणापासून कविता आणि गजलची आवड. या छंदामुळेच नगरदेवळा ता. पाचोरा येथील एका तरुण शायर सध्या देशभरातील मुशायरा गाजवित आहे. एवढेच नाही तर दिल्लीत आयोजित जश्ने - रेखता या जावेद अख्तर आयोजित कार्यक्रमातही सर्वात तरुण असलेल्या या शायरला आमंत्रित करण्यात आले होते. खान्देशला हा मान पहिल्यांदाच मिळाल्याचे सांगितले जात आहे.
जुबेरअली ताबिश (रा. नगरदेवळा) असे या तरुण शायरचे नाव. वडिल ट्रकचालक. घरात कुठलेही साहित्यिक वातावरण नाही. जुबेर हे सातवीत असतानाच दिवान- ए- गालीब हा गालिबचा संग्रह त्यांच्या हाती लागला. या संग्रहाने जुबेर यांच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली. तिथून त्याला नज्मे आणि गजल रचण्याचा आणि वाचायचा छंद लागला. २९ वर्षीय जुबेर यांनी आतापर्यंत अनेक कविसंमेलन आणि मुशायरा यात सहभाग घेतला आहे. याशिवाय अबूदहाभी, दुबई इथेही त्यांनी मुशायरात सहभाग नोंदविला आहे. आपल्या देशातील दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात, काश्मीर, हैद्राबाद आणि इतर अनेक ठिकाणी त्यांनी मुशायऱ्यात हजेरी लावली आहे. आपल्या कवितेत त्यानी जीवनाची हकीकत सांगत असतात. राहत इंदौरी, कुमार विश्वास यांच्या दिग्गज कविसोबत त्यांना कविता सादर करण्याची संधी मिळाली आहे.
कथा संग्रहाला मिळाला प्रतिसाद
चार वर्षापूर्वी प्रेमकहाणीवर आधारित ‘ तुम्हारे बात का मौसम’ हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता दोन कथासंग्रह प्रकाशित होणार असल्याचे जुबेर यांंनी सांगितले. महिन्यातून किमान चार ते पाच ठिकाणी मुशायरासाठी बोलावणे असते. त्यातून मिळणाºया मानधनातून आमच्या घरची चूल पेटत असते. असेही जुबेर यांनी नम्रपणे सांगितले.

 

Web Title: Musharra is everywhere in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.