मुस्लीम बांधवांनी घरालाच बनविले प्रार्थनास्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 03:50 PM2021-04-18T15:50:54+5:302021-04-18T15:54:28+5:30

रमजान काळात प्रत्येक घरात नमाज पठण करून रोजा सोडवला जात आहे.

The Muslim brothers built the house as a place of worship | मुस्लीम बांधवांनी घरालाच बनविले प्रार्थनास्थळ

मुस्लीम बांधवांनी घरालाच बनविले प्रार्थनास्थळ

Next
ठळक मुद्देरमजानमध्ये घरी बनवली इबादतगाहप्रत्येक घरात नमाज पठण करून सोडवला जातोय रोजाअनेकांकडून दानधर्म व मदतघर स्वच्छतेवर महिलांचा भरसलग दुसरे वर्ष कोरोनाच्या सावटाखाली 

चंद्रमणी इंगळे
हरताळा, ता.मुक्ताईनगर : कोरोना  संकटाने मानवी जीवनाचे वेळापत्रक बदलले आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र प्रार्थनास्थळे बंद आहेत. यातच रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लीम समाज बांधव घरातच इबादतगाह (भोजन) बनवून अल्लाहचे नामस्मरण करीत आहे. रमजान महिन्याचे  पहिले पर्व नुकतेच सुरू झाले आहे. मशिदीत एकत्र जमून प्रार्थना करण्यास बंदी असल्यामुळे मुस्लीम बांधवांनी घरालाच प्रार्थनास्थळ बनविले आहे. आजी-आजोबापासून नातवंडे, सुना, लेकी एकत्र बसून रोजा  व इफ्तार सोडतात. दिवसभर नमाज कुराणचे पठण, विशेष म्हणजे देशातून कोरोना हद्दपार करण्यासाठी अल्लाहला साकडे घातले जात आहे. 

ठरावीकच फळे उपलब्ध
रमजान महिन्याच्या पहिल्या पर्वात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची फळे व इतर खाद्यपदार्थांची मागणी असते. महिनाभरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे ठरावीकच फळे उपलब्ध होत आहे. काही फळांचा तुटवडा असल्याने दर वाढले आहेत. परिणामी रोजेदारांना उपलब्ध फळेच घ्यावी लागत आहे.

गरजूंना मदत
इस्लाम धर्मात नमाज रोजासह जकात सदका धर्माला विशेष महत्त्व आहे. येथील मुस्लीम बांधव आपल्या परीने संकटात सापडलेल्यांना मदत करीत आहे. अल्लाहला राजी करण्यासाठी दानधर्म करणे महत्वाचे  आहे. सर्वांनी जकात सदकात देऊन गोरगरिबांसह गरजूंची मदत करावी, असे मौलवींकडून सांगितले जाते. कोरोनापासून देशवासीयांसह जगाची लवकरच सुटका व्हावी, शांतता व भाई'चारा नांदो अशी घराघरातून प्रार्थना करण्यात येत आहे.

यंदा सार्वजनिकरीत्या उपवास न सोडता घरीच उपवास सोडून दानधर्म करण्यावर भर दिला आहे. आबालवृद्ध अशा सर्वांनी रोजा ठेवला आहे. रोजा प्रारंभीचे काही दिवस शरीर स्वीकारताना वेळ लागतो. त्यानंतर हा दिनक्रमच बदलून जातो. संपूर्ण महिनाभरात मुस्लीम बांधवांची जीवनशैली बदलून जाते. महिला तर मध्यरात्रीच्या दरम्यान उठून स्वयंपाक करतात. चारच्या सुमारास सर्वजण जेवण आटोपून सहरीच्या वेळी नमाज पठण करतात. त्यानंतर दिवसभर उपवास व सायंकाळी ठरलेल्या वेळी कुटुंबियांसोबत उपवास सोडतात. यापूर्वी अनेकजण मशिदीमध्ये जाऊन रोजा सोडत होते. यंदा कोरोनामुळे व जिल्ह्यात जाहीर केलेल्या संचारबंद मुळे सर्वांनी रोजा इफ्तार  पार्टी घरीच सोडवत असल्याचे चित्र आहे. 

गरीब कुटुंबांना जकातीच्या माध्यमातून मदत
ईदच्या दिवशी गरीब व्यक्ती या सणापासून वंचित राहू नये म्हणून त्याला मदत करण्यास सांगितले आहे. कारण जर गरीब व्यक्ती या दिवशी चांगल्या गोष्टीपासून वंचित राहात असेल तर ही गोष्ट मुस्लीम धर्मामध्ये योग्य समजली जात नाही. म्हणून गरीब माणसांना ईदपूर्वी जकात दिली जाते. जेणेकरून ही वंचित मंडळीसुद्धा वर्षातील एक दिवस आनंदाने साजरा करू शकतात.

 
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवन काळात संपूर्ण मानव जातीला विश्वबंधूत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय,  समता, उदारता, समरसता यांचे महत्त्व विशद केले. त्यांची शिकवण एका विशिष्ट धर्मापुरती मर्यादित नव्हती, तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतून प्रदर्शित होते. 
-शेख रहेमान शेख उस्मान, कुटुंबप्रमुख रोजेदार, हरताळा

Web Title: The Muslim brothers built the house as a place of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.