मुस्लीम युवकाची संत साहित्यावर पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 08:00 PM2019-01-09T20:00:55+5:302019-01-09T20:05:26+5:30
सायगाव येथील रहिवासी नशिबोदीन जैनोद्दीन मुल्ला यांनी मराठी संत साहित्यावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : सायगाव येथील रहिवासी नशिबोदीन जैनोद्दीन मुल्ला यांनी मराठी संत साहित्यावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यातील पहिले मुस्लीम युवक व महाराष्ट्रातील निवडक मुस्लीम अभ्यासकांमध्ये नशिबोदीन जैनोद्दीन मुल्ला यांनी स्थान प्राप्त केले आहे. नशिबोद्दीन मुल्ला यांचे प्राथमिक शिक्षण सायगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर सायगाव येथीलच सर्वोदय माध्यमिक विद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झाले. त्यांना लहानपणापासून वाचनाची व सामाजिक कार्य करण्याची आवड होती. त्यांना मिळालेला सामाजिक वारसा त्यांच्या दिवंगत वडिलांकडून प्राप्त झालेला आहे .
नशिबोद्दीन यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या संशोधनात वारकरी, महानुभाव, नाथपंथ, शैव पंथ, नागेश संप्रदाय व सुफी संप्रदाय या सर्वांचा चिकित्सक अभ्यास करून महाराष्ट्रात मराठी भाषा मराठी संस्कृती व साहित्य समृद्ध करणाऱ्या तत्कालीन प्राचीन मराठीतील मुस्लीम संत कवींचा विशेष अभ्यास करण्यात आला. या सर्व संतांवर पीएच.डी. करण्यासाठी त्यांनी तब्बल सात वर्षे अभ्यास केला.
नशिबोद्दीन मुल्ला यांचे शिक्षण एमए, बीएड (मराठी) झाले आहे. त्यांच्या परिवारात दोन भाऊ, चार बहिणी व आई असा परिवार आहे.
संशोधन पूर्ण झाल्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नशिबोद्दीन मुल्ला यांना कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते पीएच.डी. प्रदान करण्यात आली. या वेळी मार्गदर्शक डॉ.व्ही.एन.पाटील विषयतज्ज्ञ डॉ.सतीश बडवे, संजय पाटील, धीरज येवले, शिवाजी सोनवणे, सोपान रोकडे, प्रदीप सोनवणे, विठ्ठल माळी, दिनेश महाजन, वासुदेव रोकडे, विलास पाटील, मुश्ताक मुल्ला, आशिफ मुल्ला, शाकीर शेख, डॉ.रमेश माने वाशिम खान आदी मान्यवर उपस्थित होते.