‘वंदे मातरम’ला सर्वच मुस्लीमांचा विरोध नाही-आ. एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 05:34 PM2017-08-06T17:34:04+5:302017-08-06T17:39:13+5:30

‘सिमी : द फर्स्ट कन्व्हीक्शन इन इंडिया’या पत्रकार विजय वाघमारे लिखित पुस्तकाचे प्रकाशन

muslims not opposing 'vande mataram'-eaknathrao khadse | ‘वंदे मातरम’ला सर्वच मुस्लीमांचा विरोध नाही-आ. एकनाथराव खडसे

‘वंदे मातरम’ला सर्वच मुस्लीमांचा विरोध नाही-आ. एकनाथराव खडसे

Next
ठळक मुद्देअन् खडसेंना मिळाली होती धमकीघरकूल, सेक्स स्कँडलवर पुस्तकअलकायदा,इसिसच्या हालचाली जळगावात झाल्या-गुलाबराव पाटील

आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.६- वंदे मातरम म्हणण्यावरून वाद होतात, हे देशाचे दुर्देव आहे. ‘वंदे मातरम’ला सर्वच मुस्लीमांचा विरोध नाही. काँग्रेस आमदारांनीही वंदे मातरमला विरोध नसल्याचे मान्य केले होते, असे सांगत ‘इस देश मे रहना है, तो वंदे मातरम कहना होगा’ या भूमिकेचा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पुनरूच्चार केला. ‘सिमी : द फर्स्ट कन्व्हीक्शन इन इंडिया’या पत्रकार विजय वाघमारे लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सकाळी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात (लेवाभवन) झाले. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. समाजात भिन्न धर्मियांमध्ये एकोपा वाढत असतानाच १९९३चे मुंबई बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर काही दिवसांतच बॉर्डरवर तिघे मारले गेले. त्यांचा जळगावच्या व्यक्तीशी संबंध असल्याचे उघड झाले आणि प्रथमच सिमीची दहशतवादी बाजू उजेडात आली. आपल्याच आजूबाजूचे लोक असे काही करत असतील हे वाटलेही नव्हते. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी ‘सिमी : द फर्स्ट कन्व्हीक्शन इन इंडिया’हे वस्तुस्थितीदर्शक पुस्तक समाजासाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, सामाजिक समरसता मंचचे प्रा.आर.एन.महाजन, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बºहाटे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके, माजी महापौर विष्णू भंगाळे, अभिनव निर्माण प्रकाशन, पुणेचे समीर दरेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील, विशाल देवकर, मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड.जमिल देशपांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, अ‍ॅड.टी.डी.पाटील, लेखक विजय वाघमारे व त्यांची पत्नी छाया, आई बेबीबाई वाघमारे, उपस्थित होेते. अन् खडसेंना मिळाली होती धमकी... आमदार खडसेंनी सांगितले की, सिमीचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे निदर्शनास आल्याने राष्टÑीय सुरक्षा मंचची स्थापना करून आम्ही त्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. अवघ्या तीन दिवसांत मोर्चाचे नियोजन केलेले असतानाही मोर्चाला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यावेळी पहिल्यांदा धमकी मिळाल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. अलकायदा,इसिसच्या हालचाली जळगावात झाल्या-गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सेना, भाजपासारख्या हिंदुत्ववादी संघटना जिल्'ात प्रभावीपणे कार्यरत असतानाही जिल्ह्यात सिमीच नव्हे तर अलकायदा व इसिसच्याही हालचाली झाल्या. मात्र त्या बाबी आपल्यासमोर आल्या नाही. ‘सिमी: द फर्स्ट कन्व्हीक्शन इन इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून या बाबी आपल्यासमोर आल्या. घरकूल, सेक्स स्कँडलवर पुस्तक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बºहाटे यांनी वाघमारे यांनी प्रचंड मेहनत घेऊन सिमीवरील पुस्तक लिहील्याचे सांगितले. तसेच आता घरकूल तसेच जळगाव सेक्स स्कँडलवर पुस्तक लिहिण्याची तयारी वाघमारे यांनी सुरू केली असून त्याचा अभ्यास ते करीत असल्याचे सांगितले. या पुस्तकांमधूही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न ते करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: muslims not opposing 'vande mataram'-eaknathrao khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.