मविप्रत पाटील गटाला मनाई हुकूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:16+5:302021-04-09T04:17:16+5:30
जळगाव : मविप्र या संस्थेत स्व. नरेंद्र पाटील गटाला औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली असून १५ एप्रिलला धर्मादाय आयुक्त यांच्याकडे ...
जळगाव : मविप्र या संस्थेत स्व. नरेंद्र पाटील गटाला औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली असून १५ एप्रिलला धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत नीलेश भोईटे यांनी माहिती प्रसिध्दीस दिली आहे.
भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मादाय आयुक्तांनी ११/२०२० मविप्र संस्थेच्या आवारात मनाई हुकूम संदर्भातील निर्णय कोर्टाने रद्द करावा तसेच आज रोजी पाटील गट संस्थेवर कामकाज करीत आहे, ती परिस्थिती कायम ठेवावी अशी मागणी वीरेंद्र रमेश भोईटे व पाटील गटाने संयुक्तपणे केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली असून नरेंद्र पाटील गटाला तसेच वीरेंद्र भोईटे यांना १५ एप्रिल रोजी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे शपथपत्र दाखल करायचे आदेश पारित केले. धर्मदाय आयुक्त यांनी वरील अर्ज चार आठवड्यात निकाली काढावे असे आदेश दिले आहेत.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या इतिहासात प्रथमच बावीस वर्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले वीरेंद्र रमेश भोईटे तसेच विजय भास्कर पाटील हे निलेश भोईटे यांच्या संचालक मंडळ च्या विरोधात एकत्रित आलेले आहे. वरील याचिकेत निलेश भोईटे यांच्याकडून अॅड. व्ही.डी.होन तसेच अॅड. आबासाहेब शिंदे, अॅड. कैलासराव जाधव यांनी कामकाज पाहिले.